घरताज्या घडामोडीविकासाची शपथ राजपथ ते कर्तव्यपथ...पंतप्रधान मोदींची ग्वाही

विकासाची शपथ राजपथ ते कर्तव्यपथ…पंतप्रधान मोदींची ग्वाही

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका भव्य कार्यक्रमात सेंट्रल विस्टा एव्हेन्यूचे उद्घाटन केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य पथावर असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचेही अनावरण केले. नेताजींची ही प्रतिमा २८ फूट उंच आहे. ही प्रतिमा ग्रेनाईटपासून तयार करण्यात आली आहे. सेन्ट्रल व्हिस्टा एव्हेन्यूचे उद्घाटनं केल्यानंतर त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विकासाची शपथ राजपथ ते कर्तव्यपथाची ग्वाही दिली.

वसाहतवादाचं प्रतिक असलेला राजपथ आता इतिहासात जमा झाला आहे. आता कर्तव्यपथ नावाच्या नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

मागील आठ वर्षात आम्ही अनेक निर्णय घेतले आहेत. ज्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची छाप होती. ते अखंड भारताचे पहिले प्रणेते होते. ज्यांनी अंदमान आणि निकोबार बेटांवर राष्ट्रध्वज फडकावला होता. आम्ही आज इंडिया गेटजवळ नेताजींचा भव्य पुतळा उभारला आहे. नेताजींच्या पुतळ्याच्या स्थापनेने आम्ही सशक्त भारतासाठी एक नवीन मार्ग प्रस्थापित केला आहे, असं मोदी म्हणाले.

- Advertisement -

कर्तव्यपथावर सहा नवीन वाहनतळ बांधण्यात आले आहेत. तर सहा वेंडिंग झोन करण्यात आले आहेत. १५८० लाल-पांढऱ्या सँडस्टोनचे बोलार्ड बनवले आहेत. कचरा टाकण्यासाठी १५० डस्टबीन बसवण्यात आले असून या कर्तव्य पथावरील १९ एकर कालव्याचा पुनर्विकास करण्यात आला आहे.


हेही वाचा : ‘खेला होबे’! भाजपच्या पराभवाची सुरुवात 2024 मध्ये बंगालमधून होणार, ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -