घरठाणेठाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, रेल्वे रूळ पाण्याखाली, नागरिकांची दाणादाण

ठाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, रेल्वे रूळ पाण्याखाली, नागरिकांची दाणादाण

Subscribe

बुधवारप्रमाणे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ठाणे शहरात ढगांच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाट पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या तासाभरात ७१.१२ मिमी इतक्या पाऊस पडल्याने शहरातील असंख्य सखल भागासह ठाणे रेल्वे स्थानकातील रुळावरही पाणी साचले होते. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतुक काही वेळ ठप्प झाल्याने स्थानकात एकच गर्दी झाली होती. तर कळव्यात घर कोसळल्याचे बोलले जात आहे. तसेच चार वर्षांचा मुलगा वाहून गेल्याची प्राथमिक अंदाज महापालिकेने वर्तवला आहे. दरम्यान दोघे जखमी झाल्याचे बोलले जात आहे. या तासाभराच्या पावसाने शहरी भागात ढगफुटीचा प्रत्यय ठाणेकरांना आल्याचे बोलले जात आहे.

ठाणे शहरात सकाळपासून पावसाने उसंती घेतली होती. सायंकाळी अचानक काळोख झाला आणि ढगांच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाट पावसाला सुरुवात झाली. जोराच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाला बघता बघता पावसाचा जोर वाढल्याने आणि तासाभरात पडलेल्या ७१.१२ मिमी पावसाने नाल्यातून पाणी रस्त्यावर आले होते. यामुळे सखल भागात पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. याचदरम्यान ठाणे रेल्वे स्थानकासह कळवा मुंब्रा या स्थानकातील रेल्वे रुळावर पाणी आल्याने वाहतुक ठप्प झाली होती.

- Advertisement -

ठाणे रेल्वे स्थानकासह वर्तकनगर येथील लोकमान्य टिळक नर्सिंग होमच्या टेरेसवरती पाणी साचले. विटावा, दत्त मंदिर जवळ पाणी साचले, दादा पाटील वाडीत पाणी साचले, कोलबाड सिध्देश्वर टॉवर, कोपरी कन्हैया नगर येथे पाणी साचले होते. तसेच महात्मा फुलेनगर येथे मीत अपार्टमेंट या इमारतीजवळील नाल्याची भिंत व त्या इमारतीची सरंक्षण भिंत नाल्यात पडली. तसेच त्या इमारतीचा काही भाग खचल्यामुळे ती इमारत धोकादायक झाली आहे. याशिवाय दोन ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र कळव्यातील घर कोसळल्याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समजू शकली नाही. पण, चार वर्षांचा मुलगा वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेकडून वर्तविण्यात आला आहे.


हेही वाचा : मुंबईतील संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम, प्रवाशांचा खोळंबा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -