घरCORONA UPDATECoronavirus: आज राज्यात ४३१ नव्या रुग्णांची नोंद; १८ रुग्णांचा मृत्यू

Coronavirus: आज राज्यात ४३१ नव्या रुग्णांची नोंद; १८ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

आज राज्यात ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ५६४९ झाली आहे. १८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज ६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ७८९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याचे आरोग्य खात्यामार्फत सांगण्यात आले आहे. आज राज्यात १८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १०, पुणे येथे २, औरंगाबाद येथे २ तर कल्याण डोंबिवली येथे १, सोलापूर मनपा येथे १, जळगाव येथे १आणि मालेगाव येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या १८ मृतांमध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत. तर १२ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये (६१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २६९ झाली आहे.

- Advertisement -

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९०,२२३ नमुन्यांपैकी ८३,९७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर ५६४९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ४६५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६७९८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २५.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात १,०९,०७२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,०५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ३६८३ (१६१)
ठाणे: २४ (२)
ठाणे मनपा: १६६ (४)
नवी मुंबई मनपा: १०१ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: ९७ (३)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: ७
मीरा भाईंदर मनपा: ८१ (२)
पालघर: १९ (१)
वसई विरार मनपा: ११५ (३)
रायगड: १६
पनवेल मनपा: ३५ (१)
ठाणे मंडळ एकूण: ४३४५ (१०)
नाशिक: ४
नाशिक मनपा: ७
मालेगाव मनपा: ९४ (९)
अहमदनगर: २१ (२)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: ५ (१)
धुळे मनपा: ४
जळगाव: ४ (१)
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ७
नाशिक मंडळ एकूण: १५६ (१४)
पुणे: १९ (१)
पुणे मनपा: ७३४ (५४)
पिंपरी चिंचवड मनपा: ५२ (२)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: ३० (३)
सातारा: १६ (२)
पुणे मंडळ एकूण: ८५१ (६२)
कोल्हापूर: ६
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)
औरंगाबाद:१
औरंगाबाद मनपा: ३७ (५)
जालना: २
हिंगोली: ७
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ४८(५)
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: १
लातूर मंडळ एकूण: १३
अकोला: ११ (१)
अकोला मनपा: १०
अमरावती: ०
अमरावती मनपा: ७ (१)
यवतमाळ: १८
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ७१ (३)
नागपूर: ३
नागपूर मनपा: ९७ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १०३ (१)
इतर राज्ये: १७ (२)
एकूण: ५६४९ (२६९)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -