घरताज्या घडामोडीPMO कार्यालयातील आणखी एका सल्लागाराचा राजीनामा

PMO कार्यालयातील आणखी एका सल्लागाराचा राजीनामा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लागारांपैकी एक अमरजित सिन्हा यांनी आपल्या पदाचा आज सोमवारी राजीनामा दिला. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी याबाबतच्या माहितीवर शिक्कामोर्तब केले आहे. सिन्हा हे १९८३ च्या बिहार कॅडरचे सनदी अधिकारी आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांना पंतप्रधान कार्यालयात नेमण्यात आले होते. त्यांच्या राजीनाम्याचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आलेला हा अल्पावधीतलाच दुसरा असा राजीनामा आहे. याआधीही पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिव पी के सिन्हा यांनी मार्च महिन्यात राजीनामा दिला होता.

सिन्हा यांची नेमणुक ही पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून झाली होती. सिन्हांसोबतच भास्कर खुलबे या अधिकाऱ्याचीही नेमणुक करण्यात आली होती. सिन्हा यांनी तीन दशकांच्या कालावधीत अनेक महत्वाच्या अशा पदांवर काम केले होते. त्यामध्ये पंचायती राज मंत्रालय, ग्रामविकास यासारख्या विभागांचा समावेश होता. नॅशनल रूरल हेल्थ मिशन आणि सर्व शिक्षा अभियान या दोन्ही योजनांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ एडमिनिस्ट्रेशन येथे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सांभाळली होती. सिन्हा यांची पीएमओ कार्यालयात सल्लागार पदी नेमणुक होण्याआधी ते ग्रामविकास विभागातून सेवानिवृत्त झाले झाले होते. केंद्र सरकारच्या महत्वाच्या योजनांमध्ये त्यांची भूमिका ही अतिशय महत्वाची अशी राहिली होती.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -