घरताज्या घडामोडीअमृतपाल सिंगशीसंबंधीत तब्बल ३४८ जणांची सुटका, अकाल तख्तच्या इशाऱ्यानंतर सरकारची कारवाई

अमृतपाल सिंगशीसंबंधीत तब्बल ३४८ जणांची सुटका, अकाल तख्तच्या इशाऱ्यानंतर सरकारची कारवाई

Subscribe

खलिस्तानी नेता अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांची मोहीम सुरूच आहे. मात्र, अमृतपाल सिंगच्याविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईतील तब्बल ३४८ जणांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण ३६० जणांना अटक केली होती.

खलिस्तानी नेता अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांची मोहीम सुरूच आहे. मात्र, अमृतपाल सिंगच्याविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईतील तब्बल ३४८ जणांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण ३६० जणांना अटक केली होती. याबाबत अकाल तख्तच्या जत्थेदारांचे स्वीय सचिव जसपाल सिंग यांनी माहिती दिली. तसेच, उर्वरीत लोकांचीही लवकरच सुटका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Police Released 348 People In The Action Against Amritpal)

मिळालेल्या माहितीनुसार, कट्टर धर्मप्रचारक अमृतपाल सिंगच्याविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईत पकडलेल्या सर्व शीख युवकांची सुटका करावी, असा निर्वाणीचा इशारा अकाल तख्तचे जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी दिला होता. या आठवडय़ाच्या सुरुवातीला त्यांनी राज्य सरकारला हा इशारा दिला होता.

- Advertisement -

या कारवाईदरम्यान काही लोकांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला होता. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी सुमारे ३० टक्के लोक अट्टल गुन्हेगार आहेत, असे जत्थेदारांनी हा इशारा देणअयाच्या काही दिवस आधी पंजाब पोलिसांनी म्हटले होते. त्यानंतर इतरांचीही पडताळणीनंतर सुटका केली जाणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते.

दरम्यान, अमृतपाल सिंगने बुधवारी व्हिडीओ जारी केलाय. या व्हिडीओमधून अमृतपालने पोलिसांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. यात त्याने बैसाखीच्या निमित्ताने सरबत खालसा बोलवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी त्याने पंजाब पोलिसांवरही टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अमृतपाल सिंगने मागणी केली ती ‘सरबत खालसा’ म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -