घरमहाराष्ट्रपवार कुटुंबात वाद; नरेश म्हस्केंचा अजित पवारांवर निशाणा

पवार कुटुंबात वाद; नरेश म्हस्केंचा अजित पवारांवर निशाणा

Subscribe

ठाणेः पवार कुटुंबात वाद आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवार हे निवडून येऊ नयेत यासाठी खुद्द अजित पवार यांनी अनेकांना फोन केले होते, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत रोहित पवार यांना पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी अनेकांना फोन केले होते. तुम्ही आधी तुमच्या घरातलं बघा. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करा, असा सल्लाही नरेश म्हस्के यांनी दिला.

- Advertisement -

एमसीएच्या निवडणुकीत महाराष्ट्राचा माजी कर्णधार शंतनु सुगवेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, त्याला फारशी साथ मिळाली नाही. या निवडणुकीत रोहित पवारांनी एकतर्फी बाजी मारली. शंतनु सुगवेकर आणि घटनादुरुस्तीसाठी पाठपुरावा करणारे अभिषेक बोके दोघेही रोहित पवारांपासून खूप दूर राहिले. या निवडणूकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणापासून क्रीडा क्षेत्रातही आपले निर्विवाद वर्चस्व राखणारे शरद पवार यांचे दोन नातू या निवडणूकीच्या रिंगणात होते. रोहित पवार आणि शरद पवारांचे भाचे जावई विक्रम बोके यांचा मुलगा अभिषेक हे यावेळी एकमेकांविरुद्ध उभे होते. मात्र, अभिषेक बोके या निवडणूकीत फारच फिके पडले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची यापूर्वीची निवडणूक बेकायदेशी असल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे समजते. पण, या निकालापूर्वीच नवी निवडणूक देखील पार पडली.

या निवडणुकीत रोहित पवार यांना पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी अनेकांना फोन केल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. याला आता पवार कुटुंबियांकडून काय उत्तर मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. तेव्हापासून ते उद्धव ठाकरे गटावर वारंवार निशाणा साधत आहेत.

- Advertisement -

बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार सोडून सत्तेत येण्यासाठी काही जणांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली. हे लोक फक्त बेगडी हिंदुत्व दाखवू शकतो ते कृतीत आणू शकत नाही शकत नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार सोडलेल्या लोकांना आम्ही बाण मारला, असा टोला राम नवमीला शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -