Lockdown: मालकाने काढलं बाहेर; पती गर्भवती पत्नीला घेऊन १०० किमी चालला

कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी स्थलांतरित मजूर बेरोजगार झाले आहेत. आणि त्यांना शहरात राहण्यासाठी काहीच साधन नसल्यामुळे शेकडो किलोमीटर पायी त्यांच्या गावी जाण्यास भाग पडलं आहे.

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी स्थलांतरित मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यानंतर अनेकांनी शहराकडून आपल्या गावची वाट धरली. मात्र, सर्व गाड्या बंद असल्यामुळे नागरिक पायी प्रवास करत आहेत. दरम्यान, एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मालकाने पैसे न देता त्यांना बाहेर काढले. त्यामुळे पती आणि आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीने अन्नाशिवाय तब्बल १०० किलोमीटर पायी प्रवास केला. त्यानंतर या दोघांना मेरठ येथे आर्थिक मदत आणि हारनपूर ते बुलंदशहर पर्यंतचा उर्वरित प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली.

स्थानिक रहिवासी नवीन कुमार आणि रवींद्र यांना शनिवारी मेरठच्या सोहराब गेट बसस्टँडवर हे दांपत्य थकलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांनी नौचंडी पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक प्रेमपाल सिंग यांना याबाबतची कल्पना दिली. नौचंडी पोलिस स्टेशनचे प्रभारी आशुतोष कुमार यांनी सांगितले की, सिंग व तेथील रहिवाशांनी त्या जोडप्याला भोजन व काही रोख रक्कम दिली. तसेच बुलंदशहरच्या सियाना येथील अमरगड या गावी जाण्यासाठी त्यांना रुग्णवाहिकेची सोय करुन दिली.


हेही वाचा – Coronavirus: फ्रान्सचे माजी मंत्री पॅट्रिक डेव्हिडजियन यांचा कोरोनाने मृत्यू


कुमार म्हणाले की, वाकिल एका कारखान्यात नोकरी करत होता. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मालकाने पैसे न देता त्यांना बाहेर काढले. त्यामुळे पती आणि आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीने अन्नाशिवाय तब्बल १०० किलोमीटर पायी प्रवास केला. कोणताही पर्याय नसल्याने हे जोडपे गुरुवारी सहारनपूरहून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. महामार्गालगतचे रेस्टॉरंट्स पूर्ण बंद असल्याने त्यांना गेल्या दोन दिवसांपासून अन्न नसल्याचे यास्मीनने सांगितले.