घरदेश-विदेशमरण्यापूर्वी गरोदर महिलेनी वाचवले चार मुलांचे प्राण

मरण्यापूर्वी गरोदर महिलेनी वाचवले चार मुलांचे प्राण

Subscribe

गाझियाबाद येथे घराला लागलेल्या आगीमध्ये एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेनी मरण्यापूर्वी चार मुलांंचे प्राण वाचवले.

गाझियाबादमध्ये एका बेकरीमध्ये झालेल्या स्फोटात एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. बेकरीमधील एलपीजी सिलेंडरमध्ये हे स्फोट झाले होते. या स्फोटामध्ये एका घराची छत कोसळली. मात्र छत कोसळण्यापूर्वी या महिलेने तिच्या चार मुलांना घराबाहेर काढले होते. मात्र स्वतः बाहेर पडू शकली नाही. फातिमा (२७) असे या महिलेचे नाव असून ती आठ महिण्यांची गरोदर होती. या घराला आग लागताच येथील रहिवाशांनी अग्नीशमन दलाला याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळावर धाव घेतली. काही वेळेच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यास यश मिळाले. मात्र एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे या घराची छत कोसळली होती. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.

मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात गमावले प्राण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमा ही आपल्या पतीसोबत या परिसरात राहत होती. या घरा खालील तिच्या पतीची बेकरी होती. या बेकरीमध्ये असले्लया एलपीजी सिलेंडरमध्ये दोन स्फोट झाले. यामुळे या घराला आग लागली होती. आग लागल्याचे समजताच या महिलेनी आपल्या चार मुलांना पहिल्या मजल्यावरून खाली उतरवले. या मुलांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात फातिमा घराबाहेर पडू शकली नाही. बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असताना आग वाढल्यामुळे ही महिला बाहेर निघू शकली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -