घरCORONA UPDATEगर्लफ्रेंडला भेटण्यासाठी क्वारनटाईनमधून तरुण पळाला, गुन्हा दाखल

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी क्वारनटाईनमधून तरुण पळाला, गुन्हा दाखल

Subscribe

करोनाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण तरीही काहीजण बेजबाबदारीने वागत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना तामिळनाडुतील मदुराईमध्ये घडल्याचे समोर आले आहे. दुबईमधून आलेला एक तरुण (२४) गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी क्वारनटाईनमधून पळाला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा तरुण काही दिवसांपूर्वीच दुबईहून आला होता. पण त्याच्यात करोनाची लक्षणं दिसल्याने त्याला क्वारनटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. पण गर्लफ्रेंडची आठवण येत ्सल्यानेव त्याने तिथून पळ काढला. तरुण प्रेयसीला भेटण्यासाठी पळून गेल्याचे कळताच पोलिसांनीही तिचे घर गाठले. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याच्या संपर्कात आलेल्या गर्लफ्रेंडलाही क्वारनटाईनमध्ये ठेवले आहे. सध्या करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे कोणीही घराबाहेर पडू शकत नाहीये, मात्र लॉकडाऊनचा हा निर्णय जनतेच्या भल्यासाठी असूनही नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -