घरताज्या घडामोडीRafale Fighter Jets : फेब्रुवारीच्या सुरुवातीला भारतीय ताफ्यात 3 लढाऊ विमान दाखल

Rafale Fighter Jets : फेब्रुवारीच्या सुरुवातीला भारतीय ताफ्यात 3 लढाऊ विमान दाखल

Subscribe

शेवटचे राफेल लढाऊ विमान एप्रिलमध्ये भारतात पाठवले जाऊ शकते.हवामान चांगले राहिल्यास 1 किंवा 2 फेब्रुवारीच्या सुमारास दक्षिण फ्रान्समधील मार्सिले येथील इसरा ले ट्यूब एअरबेसवरून 3 राफेल विमाने भारताकडे रवाना होऊ शकतात.फ्रान्स ते भारत प्रवासात, UAE कडून आकाशातच एअरबस मल्टी-रोल ट्रान्सपोर्ट टँकरद्वारे इंधन भरण्याचा प्रस्ताव आहे.

भारतीय हवाई दलाची ताकद पुन्हा वाढणार आहे. 1 किंवा 2 फेब्रुवारीला आणखी 3 राफेल लढाऊ विमानांची झेप भारतात पोहोचणार आहे. भारताच्या शत्रूवर मात करण्याच्या गरजा पूर्णपणे लक्षात घेऊन या विमानांमध्ये महत्त्वाची उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे या विमानात प्रादेशिक स्तरावर शत्रूंचा मुकाबला करण्यात मदत होणार आहे. त्याप्रमाणेच, शेवटचे राफेल लढाऊ विमान एप्रिलमध्ये भारतात दाखल होणार आहेत. हवामान चांगले राहिल्यास 1 किंवा 2 फेब्रुवारीच्या सुमारास दक्षिण फ्रान्समधील मार्सिले येथील इसरा ले ट्यूब एअरबेसवरून 3 राफेल विमाने भारताकडे रवाना होऊ शकतात. फ्रान्स ते भारत प्रवासात, UAE कडून आकाशातच एअरबस मल्टी-रोल ट्रान्सपोर्ट टँकरद्वारे इंधन भरण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे.

शेवटचे लढाऊ विमानही सज्ज

तर शेवटचे लढाऊ विमानही झेप घेण्यासाठी  हे शेवटचे लढाऊ विमान एप्रिल 2022 मध्ये भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. फ्रान्सच्या 36 राफेल लढाऊ विमानांपैकी हे विमान आहे. जे भारतीय हवाई दलाच्या जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जात होते. डिसेंबर 2021 मध्ये फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना संरक्षण सचिव अजय कुमार यांनी इसरा विमानतळावर या लढाऊ विमानाची पाहणी केली होती.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये लांब पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणारी उल्का क्षेपणास्त्रे, कमी-बँड फ्रिक्वेंसी जॅमर, प्रगत संप्रेषण प्रणाली, अधिक सक्षम रेडिओ अल्टिमीटर यांचा समावेश आहे. यामध्ये हाय अल्टिट्यूड इंजिन स्टार्ट अप, सिंथेटिक अपर्चर रडार, ग्राउंड मूव्हिंग टार्गेट इंडिकेटर आणि ट्रॅकिंग, मिसाईल अॅप्रोच वॉर्निंग सिस्टीम आहे.अशाप्रकारे भारतीय हवाई दल हे शत्रूशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहे.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच 83 तेजस विमानांचा समावेश

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच 83 तेजस विमानांचा समावेश होणार आहे. 48 हजार कोटींच्या लढाऊ विमान तेजसच्या कराराला कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने मंजुरी दिली, त्यानंतर 3 फेब्रुवारी 2021 रोजी भारतीय हवाई दल आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात 83 स्वदेशी तेजस विमानांसाठी करार करण्यात आला. या करारानुसार भारतीय हवाई दलाला  48,000 कोटी रुपयांमध्ये 83 तेजस विमाने मिळणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये दिसली धोकादायक लक्षणे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -