घरताज्या घडामोडी'योग्य मुलगी...'; राहुल गांधींनी सांगितलं लग्न कधी करणार? वाचा सविस्तर

‘योग्य मुलगी…’; राहुल गांधींनी सांगितलं लग्न कधी करणार? वाचा सविस्तर

Subscribe

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात भारत जोडो यात्रा काढण्यात आली. सध्या भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी एका वृत्तवाहिनीला मुलाखती दिली. या मुलाखतीत राहुल गांधी यांनी वैयक्तिक आयुष्यातील अनुभव आणि सवयी शेअर केल्या आहेत.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात भारत जोडो यात्रा काढण्यात आली. सध्या भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी एका वृत्तवाहिनीला मुलाखती दिली. या मुलाखतीत राहुल गांधी यांनी वैयक्तिक आयुष्यातील अनुभव आणि सवयी शेअर केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी लग्न कधी करणार याबाबतही खुलासा केला.

एका चॅनलच्या मुलाखतीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना तुम्हाला काय खायला आवडते? तुमचे लग्न कधी होणार? तुम्ही रागावल्यावर काय करता? तुमची पहिली नोकरी आणि पगार काय होता? तुम्ही देशाचे पंतप्रधान झालात तर तुम्हाला काय करायला आवडेल? यांसह अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना राहिल गांधी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव आणि सवयी शेअर केल्या. (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Video When Will He Get Married How Much Salary Did He Get In First Job Updates)

- Advertisement -

या मुलाखतीत राहुल गांधी यांना तुम्हाला काय खायला आवडते? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “मी सर्व काही खातो. जे मिळेल ते खातो. मात्र, मला फणस आणि वाटाणे आवडत नाहीत. जेव्हा मी घरी असतो तेव्हा मी काय खातो आणि काय पितो याकडे विशेष लक्ष देत असतो. उत्तर प्रदेशात स्थलांतरित झालेल्या काश्मिरी पंडिताच्या घरात माझा जन्म झाला. बाबांचे वडील पारशी होते. त्यामुळे घरचे अन्नही सामान्य असते”, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले.

त्यानंतर तुमचे लग्न कधी होणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “योग्य मुलगी सापडली की लग्न करू. अट एकच आहे की मुलगी हुशार असावी. त्याच्या आई-वडिलांचे लग्न अप्रतिम होते”, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले.

- Advertisement -

खाण्यापिण्यासाठी दिल्लीतील तुमची आवडती ठिकाणे कोणती आहेत?

“पूर्वी मी जुन्या दिल्लीत जायचो. आता मोती महालाकडे जातो. मी कधी सागर, स्वागत तर कधी सरवण भवनात जातो. भारत जोडो यात्रेत मी संस्कृती जवळून पाहिली आहे. तेलंगणासारख्या काही राज्यांमध्ये मसालेदार अन्नाचा वापर खूप जास्त आहे. संस्कृती राज्यांमध्ये बदलते. मला जेवणात तंदुरी खायला आवडते. म्हणूनच चिकन टिक्का, सीख कबाब आणि चांगले ऑम्लेट आवडते”, असे राहुल गांधी म्हणाले.

तुम्ही रागावल्यावर काय करता?

“जेव्हा मला खूप राग येतो, तेव्हा मी पूर्णपणे गप्प होतो आणि असे करू नका सांगतो. भारत जोडो यात्रा ही एक तपश्चर्या आहे. भारतीय संस्कृतीत तपश्चर्याचे खूप महत्त्व आहे. म्हणूनच कोणतेही काम करताना येणाऱ्या अडचणी ही एक प्रकारची तपश्चर्या आहे”, असे राहुल गांधी म्हणाले.

तुमची पहिली नोकरी आणि पगार काय?

“मी पहिले काम लंडनमध्ये केले. त्यावेळी मला मिळणारा पगार त्या वेळेनुसार बऱ्यापैकी होता. कंपनीचे नाव ‘मॉनिटर’ होते, जी एक धोरणात्मक सल्लागार कंपनी होती. पहिल्यांदा मला चेकने पगार मिळाला. त्यावेळी मी भाड्याच्या घरात राहत होतो. त्यामुळे सर्व काही त्यातच खर्च व्हायचे. मला सुमारे अडीच हजार पौंड पगार मिळाला होता, जो त्यावेळच्या मानाने खूप होता”, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

बेडजवळच्या कपाटात काय ठेवता?

“मी बेडच्या बाजूच्या कपाटात पासपोर्ट, आयडी, रुद्राक्ष, भगवान शिव आणि बुद्ध यांचे चित्र, पर्स आणि फोन ठेवतो”, राहुल गांधी यांनी सांगितले.

तुम्ही देशाचे पंतप्रधान झालात तर तुम्हाला काय करायला आवडेल?

“मला शिक्षण व्यवस्था सुधारायची आहे. मी लहान व्यवसायात गुंतलेल्या लोकांना मदत करू इच्छितो. या लोकांना यावेळी मोठ्या उद्योगात घेण्याची गरज आहे. शेतकरी, मजूर आणि बेरोजगार युवक सध्या अत्यंत वाईट काळातून जात आहेत, त्यांना मी सुरक्षा देऊ इच्छितो”, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Congress (@incindia)


हेही वाचा – श्रद्धा हत्या प्रकरण : दिल्ली पोलिसांकडून 3 हजार पानांचे आरोपपत्र तयार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -