घरताज्या घडामोडीराहुल गांधी यांनी पायपीट करणाऱ्या मजुरांची घेतली व्यथा जाणून

राहुल गांधी यांनी पायपीट करणाऱ्या मजुरांची घेतली व्यथा जाणून

Subscribe

देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी करण्यात आला. या लॉकडाऊन दरम्यान अनेक स्थलांतरित मजूर पायपीट करत आपल्या राज्यात परतत आहेत. दरम्यान आज काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्थलांतरित मजुरांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था केली. तसंच राहुल गांधी यांनी अन्न, पाणी मास्कही दिले असल्याचे एका देवेंद्र नावाच्या मजुरांने सांगितले.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सुखदेव विहार येथून पायी चालत असलेल्या स्थलांतरित मजुरांशी चर्चा केली. माहितीनुसार राहुल गांधी यांनी ज्या स्थलांतरित मजुरांची भेट घेतली होती. त्यांच्यापैकी काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारण एका वाहनातून गर्दी करून जाणे हे नियमाप्रमाणे मान्य नाही. पोलिस म्हणाले की, काँग्रेसच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ज्या वाहनांची व्यवस्था मजुरांसाठी केली होती त्यात गर्दी झाली होती. त्यामुळे काही मजुरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

- Advertisement -

यासंदर्भात अनिल चौधरी एएनआयशी बोलताना म्हणाले की, काही मजुरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांशी बोललो आणि एका वाहनातून फक्त दोघांनाच पाठतो असे सांगितले आहे. त्यानुसार आताही पोलिसांशी आमचे कार्यकर्ते संवाद साधत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -