घरदेश-विदेश'इतिहासात अशी महागाई कधीच झाली नाही', कॉंग्रेस नेते राहुल गांधींची केंद्र सरकारवर...

‘इतिहासात अशी महागाई कधीच झाली नाही’, कॉंग्रेस नेते राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

Subscribe

सततच्या या वाढीला विरोध करण्याकरता काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केलं आहे. या आंदोलनात आता काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सामिल झाले आहेत.

मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गुरूवारी झालेल्या इंधनाच्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ११६.६७ रुपये आणि डिझेल १००.८९ रुपयांवर पोहोचलं आहे. सततच्या या वाढीला विरोध करण्याकरता काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केलं आहे. या आंदोलनात आता काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सामिल झाले आहेत.

वाढत्या इंधन दरवाढीविरोधात दिल्लीच्या विजय चौकामध्ये काँग्रेस कार्यकर्त्ये आणि नेतेमंडळी जमले असुन, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकावर जोरदार टीकाबाजी केली. त्यांनी यावेळी अशी महागाई पहिल्यांदाच झाल्याचं म्हटलं.

- Advertisement -

”काँग्रेस संपूर्ण देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या भावांविरोधात आंदोलन करत आहेत. गरिबांना याची झळ बसत आहे. इतिहासात अशी महागाई कधीच झालेलं नाही. सरकारचा अंजेडा साफ असून त्यांना गरीबांकडून पैसे लुटायचे आहेत. आम्ही आधीही सांगितलं होतं की निवडणुकानंतर पेट्रोल-डिझेलचे भाव नक्कीच वाढणार आहेत”, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.

”आम्ही आधीच भविष्यवाणी केली होती, की पाच राज्यांतील निवडणुकानंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढतील. पण हे वाढलेले भाव कमी करावे अशी आमची मागणी आहे. या वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे सामान्य जनतेला मोठी अडचण होत आहे. पण सरकारला या अडचणी दिसत नाहीत.” असं काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं.

- Advertisement -

राहुल गांधींचे पुन्हा एक खोचक ट्वीट

वाढत्या महागाईवरून राहुल गांधींनी पुन्हा एका पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक ट्वीट करत टोला हाणला आहे. ”प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान। जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥”, असं ट्वीट करत त्यांनी नरेद्र मोदी यांच्यावर टीका केली. शिवाय बाहेरच्या देशातील इंधन दराच्या किंमतीही त्यांनी शेअर केल्या आहेत.

 

खाद्यपदार्थ आणि वस्तुंचे सततचे वाढते दर आणि वाढती महागाई यावरून काल राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ”पंतप्रधानांची दररोजची टु-डू लिस्ट” असं लिहीत खोचक टीका केली आहे. राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर टीका केली आहे.

“पंतप्रधानांची रोजची टू-डू लिस्ट

पेट्रोल-डिझेल-गॅसच्या किमती किती वाढवू…
लोकांची खर्चावर चर्चा कशी थांबवू…
तरुणांना रोजगाराची खोटी स्वप्न कशी दाखवू
आज कोणती सरकारी कंपनी विकू
शेतकऱ्यांना अजून लाचार कसं करू…”

शिवाय, आपल्या ट्वीटमध्ये राहुल गांधींनी मन की बातच्या पार्श्वभूमीवर #RozSubahKiBaat असं देखील खाली म्हटलं आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी ट्विटरवर मोदींची टू-डू लिस्ट शेअर केली असून, त्यात देशातील चर्चेत असलेल्या मुद्द्यांवरून टीका केली आहे.


हेही वाचा – Babanrao Lonikar : महावितरणाच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी लोणीकरांच्या अडचणीत वाढ, ऊर्जामंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -