घरताज्या घडामोडीआम्ही मायावतींना युतीसाठी विचारलं होतं, निवडणुकीनंतर राहुल गांधींचा मोठा खुलासा

आम्ही मायावतींना युतीसाठी विचारलं होतं, निवडणुकीनंतर राहुल गांधींचा मोठा खुलासा

Subscribe

युपी निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठा खुलासा केला आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसला बसपासोबत युती करायची होती, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. मायावतींनाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांना उत्तरही दिले नाही. मायवतींनी निवडणूक लढवली नसल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी निवडणुकीपूर्वी मायावतींना युती करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. मायावती मुख्यमंत्री बनू शकतात, असं देखील राहुल गांधींनी म्हटलं होतं. परंतु प्रस्तावावार कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा उत्तर देण्यात आलं नव्हतं, असं गांधी म्हणाले. मायावती ईडी, सीबीआयच्या भितीने निवडणूक लढत नाहीयेत, असं माझं मत आहे.

- Advertisement -

आम्हाला काशी राम यांच्याबद्दल खूप आदर आहे. त्यांनी दलितांना सशक्त केले होते. काँग्रेस कमकुवत झाली आहे, पण हा मुद्दा नाही. दलितांना सक्षम बनवण्याची गरज आहे. पण मायावती म्हणतात की, त्या लढणार नाहीत. रस्ता मोकळा आहे, पण CBI, ED, Pegasus मुळे त्यांना लढायचे नाहीये, असा खुलासा राहुल गांधींनी केला आहे.

- Advertisement -

निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींच्या या वक्तव्याचा अर्थ बरंच काही सांगतोय. निवडणुकीपूर्वी बसपाने काँग्रेससोबत युती केली असती तर राजकीय परिस्थिती बदलली असती का, दोन्ही पक्षांची कामगिरी चांगली झाली असती का?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

युपीमध्ये बसपाच्या खराब कामगिरीमुळे १० टक्के कमी मतं मिळाली आहेत. २०१७ मध्ये २२ टक्क्यांवरून बसपाचं मत १२ टक्क्यांनी कमी झालं आहे.


हेही वाचा : IPL 2022 Double Header: आयपीलचा मेगा डे, आज मैदानात उतरणार तीन सलामीवर प्लेअर्स


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -