घरदेश-विदेश'काँग्रेस मुस्लिम पार्टी' वादावर राहुल गांधींचे ट्विट

‘काँग्रेस मुस्लिम पार्टी’ वादावर राहुल गांधींचे ट्विट

Subscribe

काँग्रेस मुस्लिमांची पार्टी आहे यावर राहुल गांधींनी ट्विटरवरून आपले म्हणणे मांडले आहे. मी समाजातील वंचित आणि शोषितांच्या सोबत आहे. कारण, मी काँग्रेस आहे असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेस मुस्लिमांचा पक्ष आहे या राहुल गांधी यांच्या विधानावरून मोठा वाद झाला. त्यावर आता पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी ट्विटवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी रांगेतील शेवटच्या व्यक्तीसोबत आहे. मी शोषित आणि वंचितांसोबत आहे. त्यांची जात, धर्म माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. मला प्रेमाने तिरस्कारवर मात करायची आहे. कारण, मी काँग्रेस आहे अशा शब्दात राहुल गांधी यांनी ट्विटवरून प्रतिक्रिया दिली आहे. इंकलाब या उर्दू वृत्तपत्राने राहुल गांधी यांनी काँग्रेस मुस्लिमांचा पक्ष असल्याचे विधान काही मुस्लिम नेत्यांशी बोलताना केल्याची बातमी दिली होती. त्यानंतर मोठा वाद देखील झाला होता. त्यावर राहुल गांधी यांनी ट्विटरवरून आपले म्हणणे मांडले आहे. वादानंतर काँग्रेसने राहुल गांधी यांची बाजू सावरून धरली होती. राहुल गांधी यांच्या विधानावरून भाजपने देखील जोरदार टीका केली होती. यावर भाजप फेक न्यूज पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

काय आहे वाद 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी ११ जुलै रोजी राहुल गांधी यांनी मुस्लिम बुद्धीजीवींशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर चर्चा केली होती. यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेस मुस्लिमांचा पक्ष असल्याचे विधान राहुल गांधी यांनी केल्याचा दावा इंकलाब या उर्दू दैनिकाने केला होता. जर भाजप म्हणते काँग्रेस मुस्लिमांचा पक्ष आहे तर, मी म्हणतो होय काँग्रेस मुस्लिमांचा पक्ष आहे. कारण देशातील मुस्लिमांची परिस्थिती दलितांप्रमाणे झाली आहे. काँग्रेसने नेहमी वंचितांची साथ दिली आहे असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याचा दावा इंकलाब या उर्दू दैनिकाने केला होता. त्यावरून मोठा वाद झाला. भाजपने देखील काँग्रेसला लक्ष्य करत राहुल गांधी याप्रकरणी काय वक्तव्य केले याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी भाजपने केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राहुल गांधींच्या वक्तव्याचा पुरेपुर समाचार घेतला होता. यावेळी इतिहासकार इरफान हबीब, सामाजिक कार्यकर्ते इलियास मलिक, जुनैद रहमान, ए. एफ. फारूकी, अमीर मोहम्मद खान, वकील जेड. के. फैजान, सोशल मीडिया कार्यकर्ते फराह नक्वी, सामाजिक कार्यकर्ते रक्षंदा जलील यांच्यासह जवळपास १५ लोक यावेळी हजर होते. इंकलाबने बातमी दिल्यानंतर इतिहासकार इरफान हबीब यांनी बातमीचे खंडन केले होते.

- Advertisement -

वाचा – राहुल गांधींना बालहक्क आयोगाची नोटीस !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -