घरदेश-विदेशअवैध बाटलीबंद पाणी विक्रेत्यांना रेल्वेचा दणका; देशभरात अटकसत्र

अवैध बाटलीबंद पाणी विक्रेत्यांना रेल्वेचा दणका; देशभरात अटकसत्र

Subscribe

रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्टेशनवर अवैधरित्या हलक्या दर्जाच्या बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाने कारवाईचा दणका दिला आहे. ऑपरेशन थर्स्ट नावाचे अभियानाद्वारे देशातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर ही कारवाई करण्यात आली. त्याद्वारे १३७१ विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे ६ लाख ८० हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेत केवळ रेल्वेचा अधिकृत ब्रँड असलेला रेल नीर या बाटलीबंद पाण्याच्या विक्रीची परवानगी आहे. मात्र काही विक्रेते इतर हलक्या ब्रँडचे पाणी अव्वाच्या सव्वार किंमतीला प्रवाशांच्या गळ्यात मारतात. इतकेच नव्हे, तर काही विक्रेते वापरलेल्या बाटल्यांमध्ये अस्वच्छ पद्‌धतीने नळाचे पाणी भरून ते विकतात. अशा पाण्यातून आजारांचा फैलाव होण्याचाही धोका असतो.

- Advertisement -

या सर्वांना आळा घालण्यासाठी ही रेल्वे सुरक्षा दलाने ही कारवाई केली. आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांनी सर्व विभागाच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांना ( पीसीएससी) याबद्दल कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आठ आणि नऊ जुलै रोजी ऑपरेशन थर्स्ट अंतर्गत भारतातल्या सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान आरपीएफने इतर ब्रँडच्या ६९ हजार २९४ पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या. तसेच १३७१ पाणी विक्रेत्यांवर रेल्वे ॲक्टअंतर्गत कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे ६ लाख ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला. याशिवाय रेल्वेच्या चार पँन्ट्री कार संचालकांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली. प्लॅटफार्मवर अवैधरित्या विक्री होत असलेल्या इतर अनधिकृत ब्रँडच्या स्वस्त पाणी बाटल्याही या मोहीमेत जप्त करण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -