घरदेश-विदेशदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार; वातावरणात होणार धोकादायक बदल

देशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार; वातावरणात होणार धोकादायक बदल

Subscribe

भारतातील पावसाळ्यासंदर्भात झालेल्या संशोधनात एक नवीन दावा करण्यात आला आहे. जागतिक तापमानावाढीमुळे भारतात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल. तसंच हवामानात धोकादायक बदल होतील, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. अ‍ॅडव्हान्सड सायसेन्स या जर्नलमध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालात पावसाळयात गेल्या दहा वर्षांत झालेल्या बदलांवर अभ्यास करण्यात आला.

येत्या वर्षात वारंवार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान परिस्थिती अनिश्चित असेल. याचा परिणाम प्रदेशाच्या इतिहासावर होऊ शकतो, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. या संशोधनात हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे जगात गरमी वाढत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

- Advertisement -

संगणकाच्या मॉडेल्सवर आधारीत मागील संशोधनानुसार हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे जगात गरमी वाढत आहे. आर्द्रता वाढल्यामुळे मुसळधार पावसाचे प्रमाण वाढेल. जून ते सप्टेंबर या काळात पावसाळ्यात दक्षिण आशियामध्ये मुसळधार पाऊस पडतो. येथे राहणाऱ्या जगातील वीस टक्के लोकांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या बाबी पावसाशी संबंधित आहेत. नवीन संशोधनात असं म्हटलं आहे की हवामान बदलांमुळे होणारे बदल या प्रदेशाला आणि तिचा इतिहास पुन्हा बदलू शकतात.

संशोधकांनी संशोधनासाठी मातीचा वापर केला. बंगालच्या उपसागरातून ड्रिलिंगद्वारे मातीचे नमुने काढले. खाडीच्या मधोमध काढलेल्या मातीचे नमुने २०० मीटर लांबीचे होते. संशोधनानुसार, आता मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात हरितगृह वायूंची पातळी वाढत आहे. यामुळे पावसाळ्याची अशीच पद्धत पुढे येण्याची शक्यता आहे. ब्राउन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासाचे प्रमुख स्टीव्हन क्लेमेन्स यांनी म्हटलं की, “आम्ही याची पुष्टी करू शकतो की गेल्या लाखो वर्षांपासून वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडच्या वाढीमुळे दक्षिण आशियात पावसाळ्याच्या मोसमात मुसळधार पाऊस झाला आहे. हवामान मॉडेल्सची भविष्यवाणी गेल्या दहा लाख वर्षांच्या परिस्थितीशी सुसंगत असल्याचे आढळले आहे.

- Advertisement -

लोकांना पावसाळा धोकादायक होईल

जर्मनीच्या पॉट्सडॅम इन्स्टिट्यूटमधील क्लायमेट सिस्टीम्सचे प्राध्यापक अँडर्स लेव्हरमन म्हणतात की आपल्या ग्रहाच्या दहा लाख वर्षांच्या इतिहासाची झलक दाखविणारी आकडेवारी आश्चर्यकारक आहे. लीव्हरमॅन म्हणतात की भारतीय उपखंडातील लोकांसाठी दुष्परिणाम भयानक असतील. पावसाळ्यात यापूर्वीच मुसळधार पाऊस सुरू आहे. तो विध्वंसक असू शकतो. भीषण पावसाळ्याचा धोका वाढत चालला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -