घरदेश-विदेशइमर्जन्सी फंड उभारू!

इमर्जन्सी फंड उभारू!

Subscribe

पंतप्रधान मोदींचे सार्क देशांना आवाहन

चीनच्या वुहानमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या करोनाने जगभरात पाय पसरले आहेत. जगभरात 1,56,396 करोना विषाणूंनी संक्रमित झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सार्क देशातील नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी कोरोनाशी लढू आणि जिंकू असे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.करोना विषाणुंसाठी एका इमर्जन्सी फंड उभारण्याचा प्रस्ताव सार्क देशांसमोर ठेवताना त्यासाठी भारताकडून 1 कोटी डॉलर देण्याची घोषणाही नरेंद्र मोदींनी केली.

व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुरू असलेल्या या चर्चेत पंतप्रधान मोदींसह श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, मालदीव, भूतान व नेपाळ या राष्ट्रांच्या प्रमुखांचा सहभाग आहे. करोना विषाणुंशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सार्क राष्ट्रांना एकत्र करत करोनासाठी आपत्कालीन निधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. शिवाय, भारताकडून यासाठी एक कोटी डॉलरची मदत दिली जाणार असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपले लोकपातळीवरील संबंध प्राचीनकाळापासून आहेत. आपल्या समाज एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने तयारी करून कृती करावी व सामूहिक यश मिळावावे. आपल्याला करोनाला घाबरण्याची आवश्यकता नाही. तर एकत्र येवून त्याच्याशी लढण्याची गरज आहे. सार्क राष्ट्रांना सतर्क राहावे लागेल. सार्क राष्ट्रांमध्ये १५० पेक्षा कमी व्यक्ती आढळले आहेत.

भारतात करोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाला महामारी घोषित केले आहे. करोनापासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. भारतात जानेवारीपासून स्क्रीनिंग केली जात आहे. करोनाचा धोका पाहता १४०० भारतीयांना जगभरातील विविध देशांमधून परत आणण्यात आले आहे. याचबरोबर शेजारील देशाच्या काही नागरीकांना देखील आम्ही मदत केली असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.यावेळी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोलिह यांनी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करत म्हटले, संकट काळात आपण एकत्र आलो आहोत. कोणतेच राष्ट्र या विषाणुंशी एकटच लढू शकत नाही, यामध्ये सर्वांची मदत हवी आहे. मालदीव नशीबवान आहे, आम्हाला भारताची मदत मिळाली.

- Advertisement -

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटबाय राजपक्षे म्हणाले, श्रीलंकेत हा विषाणू पसरू नये, हेच आमच्यासमोर मोठे आव्हान आहे. श्रीलंकेत परदेशातून परतणार्‍या नागरिकांना १४ दिवसांसाठी देखरेखीखाली ठेवलं जात आहे. आमच्या देशातील विद्यापीठ व महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी यावेळी पंतप्रधान मोदींचे चर्चा आयोजानासाठी पुढाकर घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच, वुहानमधील २३ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी धन्यवादही दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -