घरदेश-विदेश२००८ परप्रांतीय मारहाण प्रकरण, राज ठाकरेंना जामीन

२००८ परप्रांतीय मारहाण प्रकरण, राज ठाकरेंना जामीन

Subscribe

२००८ साली परप्रांतियांना झालेल्या मारहाणी प्रकरणी राज ठाकरेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

भूमिपूत्रांच्या प्रश्नावरून राज ठाकरे अर्थात मनसे आक्रमक झालेली पाहायाला मिळते. यापूर्वी देखील मनसेनं याच मुद्यावरून परप्रांतीयांना मारहाण केलेली आहे. २००८ साली रेल्वेमध्ये भरती निघाल्याची जाहिरात युपी, बिहारमधील पेपरमध्ये झळकली. पण, महाराष्ट्रात मात्र त्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे मनसेनं आंदोलन केले. यावेळी परप्रांतीयांना जबरदस्त मारहाण देखील करण्यात आली. त्यानंतर राज ठाकरेंवर इगतपुरीमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पण, न्यायालयीन सुनावणी दरम्यान राज ठाकरे दरवेळी हजर राहत नव्हते. त्यानंतर न्यायालयानं त्यांना समन्स बजावत हजर राहण्यास सांगितले होते. त्यासाठी राज ठाकरे इगतपुरी येथील न्यायालयामध्ये आले होते. यावेळी नाशिक, मुंबईतील कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर हजर होते. सुनावणी दरम्यान न्यायालयानं राज ठाकरे यांना जामीन देखील मंजूर केला आहे. राज ठाकरेंना जामीन मंजूर होताच कार्यकर्त्यांना फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण

२००८ साली मनसेनं रेल्वे भरती वेळी परप्रांतीयांना बेदम मारहाण केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. राज ठाकरेंना अटक झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय हॉटेलवर हल्ला केला होता. यानंतर इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणामध्ये यापूर्वीच सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पण, राज ठाकरे यांच्यावरील गुन्हा मात्र कायम राहिला. शिवाय, सुनावणी वेळी राज ठाकरे गैरहजर देखील राहिले. अखेर, इगतपुरी न्यायालयाने त्यांना आजच हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना जामिन मंजूर करण्यात आला आहे.

वाचा – मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ओढली राज ठाकरेंची ‘री’!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -