घरताज्या घडामोडीAfghanistan Crisis: भारताचा इशारा; ...तर अफगाणिस्तानात लष्करी कारवाई - राजनाथ सिंह

Afghanistan Crisis: भारताचा इशारा; …तर अफगाणिस्तानात लष्करी कारवाई – राजनाथ सिंह

Subscribe

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती खूप आव्हानात्मक झाली आहे. या परिस्थितीमुळे अनेक देशांना आपली रणनीती बदलण्यास भाग पाडले आहे. याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी तामिळनाडूच्या वेलिंगटनमध्ये डिफेंस सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये म्हणाले की, ‘वर्तमानातील परिस्थितीमुळे आम्हाला आपली रणनीती बदलण्यास भाग पाडले आहे. आता भारत अफगाणिस्तानबाबत पुनर्विचार करत आहे. त्यामुळे नवीन रणनीती तयार करत आहे. जर गरज पडली तर आम्ही त्याच्या धरतीवर जाऊन लष्करी कारवाई करून आणि दहशत संपवू.’

पुढे राजनाथ सिंह म्हणाले की, ‘अशा समस्यांसोबत लढण्यासाठी संरक्षण मंत्रालय इंटीग्रेटेड बॅटल ग्रुप बनवण्यावर वेगाने विचार करत आहे. कारण युद्धाच्या वेळी तुम्ही किती लवकर निर्णय घेता हे महत्त्वाचे असते. हा बॅटल ग्रुप लवकर निर्णय तर घेईलच शिवाय सैनिकांचे युनिटही तयार करेल. आपल्या शत्रूचा खात्मा करण्यासाठी हा बॅटल ग्रुप सक्षम असेल.’

- Advertisement -

‘भारतातील तरुणांनी सैनिकांसारखी देशभक्ती आणि शिस्त शिका. यासाठी आम्हाला नवीन मार्ग शोधावे लागतील. ज्यामुळे सैनिकांकडे तरुणांचा पाहण्याचा दृष्टीकोन वाढले. त्यामुळे संरक्षण मंत्रालय टूर ऑफ ड्यूटीवर गंभीर विचार करत आहे. हा निर्णय आमचा गेम चेजिंगप्रमाणे असेल आणि भारतीय सैन्याचे सरासरी वय देखील कमी करेल,’ असे राजनाथ सिंह म्हणाले.

पाकिस्तानविषयी राजनाथ सिंह म्हणाले की, ‘दो लढाई हरल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात दहशतवाद्यांची मदत घेण्यास सुरुवात झाली आहे. ते दहशतवाद्यांना शस्त्र आणि प्रशिक्षण देत आहेत. परंतु एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, आता भारत बदलला आहे आणि आपल्या भूमीवर दहशतवाद्यांना राहू देणार नाही. शिवाय त्यांच्यावर विरोधात मोहीमही राबवेल. सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर शांतता आहे, कारण भारत आता आपला बचावात्मक दृष्टीकोन सोडून प्रत्युत्तर देत आहे, हे पाकिस्तानला माहित झाला आहे. जगाला याची २०१६मध्ये बालाकोट स्ट्राइकमध्ये माहिती झाली आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – ९/११ हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा सहभाग नव्हता, तालिबान्यांचा दावा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -