घरताज्या घडामोडीशेतकरी आंदोलन चर्चा : 'आप'चे तीन खासदार निलंबित, राज्यसभेच्या सभापतींची कारवाई

शेतकरी आंदोलन चर्चा : ‘आप’चे तीन खासदार निलंबित, राज्यसभेच्या सभापतींची कारवाई

Subscribe

राज्यसभेचे सभापती एम वैंकय्या नायडू यांनी आम आदमी पक्षाच्या तीन खासदारांवर बुधवारी निलंबनाची कारवाई केली. त्यामध्ये खासदार एम पी सिंह यांच्यासह आणखी दोन खासदारांचा समावेश आहे. सभापतींनी राज्यसभेच्या कामकाजासाठीच्या नियम २५५ अन्वये ही कारवाई केली आहे. त्यानुसार राज्यसभेतून तीन जणांवर निलंबनाची कारवाई करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या तिघांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर ९.४० पर्यंत कामकाज स्थगित करण्याचे आदेश त्यांनी दिले. राज्यसभेच्या कामकाजादरम्यान घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. एम पी सिंह, नरेन दास गुप्ता आणि सुशील कुमार गुप्ता अशी निलंबित झालेल्या खासदारांची नावे आहेत. संपुर्ण दिवसभरासाठी या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सभापतींनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कारवाई करत राज्यसभेचे कामकाज दुसऱ्यांदा १०.३० पर्यंत तहकूब केले. नव्या कृषी विधेयकांविरोधात घोषणाबाजी केल्यानेच हे निलंबन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

तुम्ही माझ्या संयमाचा अंत पाहू नका, मला तुमच्यावर कायद्याचा वापर करत निलंबनाची कारवाई करावी लागेल असा ईशारा राज्यसभेच्या सभापतींनी सुरूवातीलाच दिला होता. पण तरीही गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू राहिल्याने त्यांनी कारवाईचा बडगा या तिनही खासदारांविरोधात उगारला. तर सरकारमधील खासदार आणि विरोधक यांनी नव्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या विषयावर अधिकाधिक वेळ देण्याच्या मागणीवर एकमत कायम केले आहे. राज्यसभेच्या कामकाजात प्रश्नोत्तराचा तास रद्द करतानाच ही वेळ शेतकरी आंदोलनाच्या चर्चेसाठी वापरण्यावर खासदारांचे एकमत झाले. त्याआधी मंगळवारी कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांमार्फत शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या विषयावर चर्चेची मागणी झाल्यानेच मंगळवारी राज्यसभेचे कामकाज खोळंबले होते. त्यानंतर संपुर्ण दिवसभराचे कामकाज हे तहकूब करण्यात आले.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनावर तब्बल १५ तास चर्चा होईल असे अपेक्षित. त्यासाठीच प्रश्नोत्तराचा तासही रद्द करण्यावर सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत झाले आहे. मंगळवारी झालेल्या कामकाजात राज्यभेचे सभापती वैंकय्या नायडू यांना तीनवेळा राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. बुधवारी सकाळी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच अवघ्या काही मिनिटातच दोनवेळा कामकाज तहकूब करण्याची वेळ सभापींवर आली.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -