घरदेश-विदेशप्रभू रामाच्या शोभा यात्रेत नथूराम गोडसे; निलंबित भाजप आमदार राजा सिंग आयोजक

प्रभू रामाच्या शोभा यात्रेत नथूराम गोडसे; निलंबित भाजप आमदार राजा सिंग आयोजक

Subscribe

 

हैदराबादः हैदराबाद येथे राम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा फोटो नाचवण्यात आला. त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकीत झाले. भाजपचे निलंबित आमदार राजा सिंग यांनी या शोभा यात्रेचे आयोजन केले होते.

- Advertisement -

गुरुवारी देशभरात राम नवमीचा उत्साह दिसला. ठिकठिकाणी शोभा यात्रा काढण्यात आल्या. विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वांमध्ये हैदराबाद येथे निघालेल्या शोभा यात्रेत चक्क नथुराम गोडसेचा फोटो नाचवण्यात आला. मिरवणुकीत श्री रामाच्या घोषणा देण्यात आल्या. श्री रामाची गाणी वाजवण्यात आली. मिरवणुकीचा जल्लोष सुरु असताना त्यामध्ये अचानक नथुराम गोडसेचा फोटो झळकला. हा फोटो नाचवला जात होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओवर अनेकांनी टीकाही केली.

यावेळी राजा सिंग यांनी भाषणही केले. ते म्हणाले, आपल्याला हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे. हिंदुंनी कोणालाही घाबरु नये. एक हिंदू १० हजार लोकांशी लढू शकतो. आपल्या जेष्ठ मंडळींनी कष्ट करुन राम मंदिर उभे केले आहे. आता आपल्याला काशी आणि मथुरा मंदिरावर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे.

- Advertisement -

राम नवमीनिमित्त महाराष्टातही ठिकठिकाणी शोभा यात्रा निघाल्या. छत्रपती संभाजीनगर येथे राम नवमीच्या पूर्वसंध्येला दोन गटात हाणामारी झाली. दगडफेक झाली. पोलिसांची गाडी फोडण्यात आली. यामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले. या दंगलीचे खरे मास्टर माईंड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. चंद्रकांत खैरे म्हणाले, केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांनीच ही दंगल घडवून आणली आहे. या दंगलीचे मुख्य मास्टर माईंड देवेंद्र फडणवीस आहेत. फडणवीस आणि भाजप या दंगलीचे मुख्य सुत्रधार आहेत. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यांच्या माध्यमातूनच ही दंगल घडवण्यात आली आहे.

तर मुंबईतील मालवणी येथील शोभायात्रेत गेट क्रमांक पाच जवळ दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी झाली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना घडली. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला.  दगडफेक आणि लाठीचार्जमध्ये 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -