Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अयोद्धेचे राम मंदिर २०२३मध्ये भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार

अयोद्धेचे राम मंदिर २०२३मध्ये भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार

गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोद्धा मंदिराची पायाभरणी केली होते

Related Story

- Advertisement -

अयोद्धेच्या भव्य राम मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे. राम मंदिर २०२५ पर्यंत बांधून पूर्ण होणार आहे. मात्र २०२३ मध्ये राम मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. ( Ram Temple of Ayodhya will be open for darshan to devotees in 2023) गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोद्धा मंदिराची पायाभरणी केली होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम मंदिराच्या उभारणीत स्टील आणि विटांचा वापर करण्यात आलेला नाही. मुख्य मंदिराचे बांधकाम पाच एकर जमिनीत करण्यात येत असून इतर जमिनीवर संग्रहालय आणि ग्रंथालय सारखी केंद्र तयार करण्यात येणार आहेत. आयआयटी बॉम्बे, दिल्ली, मद्रास, गुहावटीचे विशेषज्ञ आणि केंद्रीय इमारत संशोधन संस्था आणि रुडकीचे तज्ञ आणि L and T आणि टाटा ग्रुपचे इंजिनिअर्स कॅम्पसच्या माध्यमातून राम मंदिराच्या नियोजसाठी योगदान देण्यात येत आहे.

राम मंदिराच्या उपक्रमांचा प्रारंभ करण्याआधी मंदिराला पुरातन रुप देण्यासाठी मंदिराचे डिझाइन फाइनल करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या उभारणीत कोणत्याही प्रकारच्या स्टीलचा वापर करण्यात येणार नाहीये. मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे दगड जोडण्यासाठी ताब्यांच्या पानांचा वापर करण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण ट्रस्टचे संपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोद्धेचे राम मंदिर हे प्राचीन बांधकाम पद्धतीने बांधले जात आहे. त्यामुळे हे मंदिर हजारो वर्षे टिकेल. भूकंप, वादळ किंवा कोणताही आपत्ती आली तरी मंदिराचे कोणतेही नुकसान होणार नाही.

- Advertisement -

येत्या ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला १ वर्ष पूर्ण होणार आहे. त्यानिमित्ताने ट्रस्ट एका कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. प्रभू श्री रामाला पाहण्यासाठी आलेले भाविक त्यांच्या डोळ्यांनी मंदिराचे सुरू असलेले बांधकाम पाहू शकणार आहेत. राम मंदिर उभारताना पाहणे ही अनेक भक्तांची इच्छा आहे त्यामुळे भक्तांच्या भावनांचा आदर करुन त्या ठिकाणी एक व्ह्यू पॉइंट तयार करण्यात आला आहे.


हेही वाचा – पंतप्रधानांचं घर भाड्याने देणे आहे!

- Advertisement -