घरमनोरंजनरिंकू राजगुरू झळकणार 'आठवा रंग प्रेमाचा' या आगामी चित्रपटात

रिंकू राजगुरू झळकणार ‘आठवा रंग प्रेमाचा’ या आगामी चित्रपटात

Subscribe

'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटात आजच्या काळातली प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेमाचे अनेक रंग असतात. त्यातला आठवा रंग कोणता? याची उत्सुकता या चित्रपटाच्या पोस्टरनं निर्माण केली आहे.

समीर कर्णिक निर्मित ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा आगामी चित्रपट येत्या १७ जूनला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट चिरंतन राहणारं प्रेम या संकल्पनेवर आधारित असून, ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद ही नवी कोरी जोडी चित्रपटाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव, राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. रिंकू राजगुरूसोबत विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

- Advertisement -

याआधी समीर कर्णिक यांनी “क्यू हो गया ना..” या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटवला होता. त्यानंतर “यमला पगला दिवाना”, “चार दिन की चांदनी”, “हिरोज”, “नन्हे जैसलमेर” अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर कर्णिक यांनी केलं आहे.

‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटात आजच्या काळातली प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेमाचे अनेक रंग असतात. त्यातला आठवा रंग कोणता? याची उत्सुकता या चित्रपटाच्या पोस्टरनं निर्माण केली आहे. अतिशय रंजक असं हे पोस्टर असून, यातील आठवा रंग प्रेमाचा प्रेक्षकांवर भूल पाडेल यात शंकाच नाही.

- Advertisement -

हेही वाचा :RRR ची रेकॉर्ड ब्रेक कमाई; आनंदात Ram Charan ने वाटली सोन्याची नाणी अन् मिठाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -