घरCORONA UPDATE'त्या' ९६० परदेशी नागरिकांना टाकले काळ्या यादीत, वीजाही केला रद्द; गृहमंत्रालयाची कारवाई

‘त्या’ ९६० परदेशी नागरिकांना टाकले काळ्या यादीत, वीजाही केला रद्द; गृहमंत्रालयाची कारवाई

Subscribe

तबलीगी मरकजमध्ये सहभागी झालेल्या ९६० परदेशी नागरिकांना गृहमंत्रालयाने काळ्या यादीत टाकले असून त्यांचे वीजादेखील रद्द केले आहेत.

दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलीगी जमातच्या मरकजमध्ये लॉकडाऊच्या काळात एकत्र जमल्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. सर्व प्रथम पोलिसांनी येथे जमलेल्या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तर आता मिळालेल्या माहितीनुसार तबलीगी मरकजमध्ये सहभागी झालेल्या ९६० परदेशी नागरिकांना गृहमंत्रालयाने काळ्या यादीत टाकले असून त्यांचे वीजादेखील रद्द केले आहेत. ते सर्व नागरिक भारतामध्ये टुरिस्ट वीजावर आले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने तबलीगी जमात प्रकरणी दिल्ली पोलीस तसेच इतर संबंधित राज्यातील पोलीस निरीक्षकांना विदेशी अधिनियम १९४८ नुसार प्रबंधन अधिनियम २००५ कलमाचे उल्लंघन केल्यामुळे त्या ९६० परदेशी नागरिकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत.

दरम्यान, गुरुवारी आरोग्य आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लॉकडाऊनचा आदेश धुडकावत दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या ९००० कार्यकर्ते व त्यांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटली आहे. त्यांना क्वारनटाईनमध्ये ठेवण्यात आले असून त्यात १३०६ परदेशी नागरिक असून उर्वरित भारतीय नागरिक आहेत, अशी माहिती गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. तसेच दिल्लीत तबलीगी जमातीमधील २ हजार लोकांपैकी १ हजार ८०४ जणांना क्वारनटाईन करण्यात आले तर ३३४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. या जमातीमधील ४०० जणांना कोविड १९ ची लागण झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

कालपासून ३२८ नवीन केसेस समोर आल्या असून १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर १९६५ जणांना कोरोनाची लागण झाली असून देशात कोरोनामुळे ५० जणांचा मृत्यू झाला आणि १५० लोक कोरोनामुक्त झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा –

देशभरात ९००० तबलीगी जमातीचे लोकं क्वारनटाईनमध्ये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -