घरताज्या घडामोडीभयंकर! अल्पवयीन मुलीवर बलात्कारासाठी तीस जणांच्या रांगा

भयंकर! अल्पवयीन मुलीवर बलात्कारासाठी तीस जणांच्या रांगा

Subscribe

एका १६ वर्षांच्या मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्काराची भयंकरर घटना इस्राईलमध्ये घडली आहे. हे विकृत एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला. नवभारत टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

इस्रायलच्या किनारी भागातील इलट या शहरातील ही घटना आहे. ही मुलगी मित्रांबरोबर पार्टी करण्यासाठी गेली होती. एका हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती. पार्टीत दारू प्यायल्यानंतर हॉटेलमधील त्यांच्या खोलीच्या बाथरूमध्ये ती गेली. त्यानंतर त्या रूममध्ये काहीजण घुसले आणि त्यांनी तीच्यावर बलात्कार केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे आरोपी एकमेकांना ओळखतही नव्हते. त्या खोलीच्या बाहेर अक्षरश:  रांग लावून त्यांनी तीच्यावर अत्याचार केले.

- Advertisement -

साधारण ३० लोकांनी या मुलीवर बलात्कार केल्याचं समजत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ बनवण्यात आला आणि तो व्हायरल करण्यात आला. त्यानंतर मुलीने केलेल्या तक्रारीनुसार दोन जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे. काही आरोपींनी मुलीच्या परवानगीने हे कृत्य केल्याचं म्हटलं आहे. या घटनेचे पडसाद इस्त्राइलच्या राजकीय वर्तूळातही उमटले आहेत. इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा प्रकार माणूसकीला काळीमा फासणारा असल्याचे म्हटले आहे. या पीडीतेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील तपासाला वेग येईल असं पोलिसांच म्हणणं आहे.


हे ही वाचा – दिलीप कुमार यांच्या धाकट्या भावाचे कोरोनामुळे निधन!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -