घरताज्या घडामोडीशिक्षकाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, अश्लील व्हिडिओ करून केले ब्लॅकमेल!

शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, अश्लील व्हिडिओ करून केले ब्लॅकमेल!

Subscribe

याप्रकरणी शिक्षकासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका शिक्षकाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हरयाणाच्या हिसारमध्ये घडली आहे. याप्रकरणी शिक्षकासह इतर दोघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. माहितीनुसार, हा शिक्षक मुलीचा अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करत होता.

नेमके काय घडले?

मुलगी एका गावातल्या तरुणाकडे क्लाससाठी जात होती. २७ ऑक्टोबर २०१९ रोजी संध्याकाळी एका तरुणाने मुलीला रस्त्यात रोखले आणि तिचा विनयभंग केला. त्यावेळेस तिने स्वतःची कशी बशी सुटका करून घेतली. त्यानंतर २८ ऑक्टोबरला क्लास शिक्षकाच्या छोट्या भावाने मुलीसोबत गैरवर्तन केले होते. या घटनेच्यानंतर मुलीने क्लास शिक्षकाला याबाबत सांगितले. तेव्हा शिक्षकाने त्या तरुणांना समज देईल असे आश्वासन दिले. कोणी तुझ्यासोबत गैरवर्तन करणार नाही. पण घरी कुणालाही ही गोष्ट सांगू नकोस, असे शिक्षकाने सांगितले.

- Advertisement -

तक्रारीत पीडित मुलीने सांगितले की, ‘तिला शिक्षण सोडायचे नसल्याने तिने घरी याबाबत काही सांगितले नाही. ३० ऑक्टोबर रोजी शिक्षकाने देखील क्लास झाल्यानंतर मुलीवर बलात्कार केला आणि त्यावेळेस त्या घटनेचा अश्लील व्हिडिओ तयार केला. त्यानंतर शिक्षकाने तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला.’

पुढे पीडित मुलीने सांगितले की, ‘जेव्हा शिक्षकाने व्हिडिओ दाखवला त्यावेळेस त्याने सांगितले की, हा व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करण्यासाठी तुला पैसे द्यावे लागतील. त्यानंतर त्याने सतत धमकी द्यायला सुरुवात केली. ३० जुलै २०२० पर्यंत तिने ५० हजार रुपये दिले. तरीही त्याने व्हिडिओ डिलिट केला नाही. ६ सप्टेंबरला शिक्षकाने पुन्हा तिला धमकी दिली. ती घरातून पैसे घेऊन त्याला देत होती. पण यावेळेस तिच्या आईने अचानक पाहिले आणि त्यानंतर तिने आईला याबाबत सर्व काही सांगितले.’

- Advertisement -

महिला पोलीस स्टेशन प्रभारी सुनीता यांनी सांगितले की, ‘एका क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी शिक्षकांसह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.’ पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, ‘शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केला आणि इतर दोन जणांनी तिचा विनयभंग केला. त्यापैकी सुशील, राकेश आणि अंकित हे तिन्ही आरोपी आहेत.’


हेही वाचा – ‘ती आता Masoom राहिलेली नाही’, उर्मिला मातोंडकरवरचं जुनं Amul Cartoon व्हायरल!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -