घरदेश-विदेशउंदराने संपवली दारु?

उंदराने संपवली दारु?

Subscribe

सध्या देशभरात ३१ डिसेंबर म्हणजेच इयर एंडची तयारी सुरु आहे. यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. बरेली पोलिसांनी अशीच रेड टाकून काही लीटर दारु जप्त केली.

आतापर्यंत उंदिराने अमुक धान्याची पोती कुरडली, घरातील धान्याचे प्लास्टिक डबे कुरतडले, असे सगळे ऐकले असेल. पण तुम्ही कधी उंदराने दारु प्यायली हे ऐकले आहे का? आणि ती सुद्धा कितीतरी लीटर..हा आता दारु प्यायलेला उंदिर कसा झिंगेल?असा विचार करुनही तुम्ही पाहिला असेल. हो ना! आता ही घटना घडली आहे बरेलीमध्ये पोलिसांनी हजारो लीटर दारु जप्त केली हीच दारु उंदरांनी फस्त केली आहे.

केजरीवालांच्या कार्यक्रमात गडकरींना करावा लागला हस्तक्षेप

नेमकी घटना काय?

सध्या देशभरात ३१ डिसेंबर म्हणजेच इयर एंडची तयारी सुरु आहे. यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. बरेली पोलिसांनी अशीच रेड टाकून काही लीटर दारु जप्त केली. ती दारु पोलिस स्टेशनच्या स्टोअर रुममध्ये ठेवली. पोलीस बुधवारी स्टोअर रुममध्ये तपासणी करायला आले त्यावेळी त्यांना स्टोअर रुममध्ये रिकामी बाटल्या दिसल्या. या बाटलीला लहान लहान छिद्रे पडलेली होती. ही दारु उंदीर प्यायले अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

गँग्स ऑफ रॅट

पोलिसांनी या संदर्भातील माहिती देताना ‘गँग्स ऑफ रॅटस’ यासाठी कारणीभूत असल्याचे विचित्र उत्तर दिले आहे आणि आता याहून महत्वाची आणि हसण्यासारखी गोष्ट अशी की, पोलीस आता या दारु प्यायलेल्या उंदराचा शोध घेणार आहेत. शिवाय स्टोअर रुम जुने झाले होते. त्यामुळेच उंदीर या ठिकाणी आले असतील, असे उत्तर पोलीस अधीक्षक अभिनंदन सिंह यांनी दिले आहे.

ट्रिपल तलाक कायद्यामुळे मुस्लिम महिला रस्त्यावर येतील – ओवेसी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -