घरदेश-विदेशमहाराष्ट्रातील बॅंकेवर RBI कडून निर्बंध; १० हजारांच्यावर पैसे काढता येणार नाही

महाराष्ट्रातील बॅंकेवर RBI कडून निर्बंध; १० हजारांच्यावर पैसे काढता येणार नाही

Subscribe

भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक स्थिती बिकट असलेल्या आणखी एका बँकेवर निर्बंध लादले आहेत. यामुळे या बँकेतील खातेदारांना आत्ता १० हजारांच्यावर पैसे काढण्यास परवानगी नसेल. आरबीआयने महाराष्ट्रातील नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बँकेवर ही कारवाई केली आहे. बँकेच्या ढासळत चाललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.

बँकिंग नियमन अधिनियम १९४९ अंतर्गत ६ डिसेंबर २०२१ पासून पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू असतील. यानंतर पुढील समीक्षा केली जाणार आहे. आरबीआयच्या या निर्बंधांमुळे बँकेच्या खातेदारकांना त्यांच्या बचत किंवा चालू खात्यातून फक्त १० हजार रुपये काढता येणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यास परवानगी नसेल.

- Advertisement -

६ महिने बँकेवरील निर्बंध कायम

आरबीआयच्या आदेशानुसार, नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर ६ महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. ६ महिन्यानंतर आरबीआय पुढील निर्णय जाहीर करेल. ज्यानंतर नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या व्यवहारांवरील निर्बंध हटवले जाऊ शकतात.

कर्ज मिळणे झाले बंद

आरबीआयने म्हटलं आहे, की आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज किंवा अग्रिम देता येणार नाही, शिवाय  कर्जाचे नूतनीकरण करणार नाही. मात्र बँकेकडून कोणत्याही प्रकारची गुंतवणूक, कोणत्याही प्रकारचे दायित्व घेणे, पेमेंट करणे आणि मालमत्तेचे हस्तांतरण किंवा विक्री करण्यावरील निर्बंध हटवले जात आहेत.

- Advertisement -

बँकेचे लायसन्स होणार रद्द?

रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांच्या आदेशाची प्रत बँकेच्या आवारात लावण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांना या कारवाईबाबतची माहिती मिळू शकेल. मात्र, हे निर्बंध म्हणजे बँकिंग परवाना रद्द करण्यात आलाय, असा अर्थ घेऊ नये, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -