घरदेश-विदेश'हिरोईन ऑफ दि हायजॅक' नीरजा हिच्या स्मृती आजही जीवंत

‘हिरोईन ऑफ दि हायजॅक’ नीरजा हिच्या स्मृती आजही जीवंत

Subscribe

बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूरने ‘नीरजा’ या चित्रपटातून एका धाडसी तरुणची कथा जिवंत केली. या धाडसी तरुणीची कथा पाहण्यासाठी संपूर्ण देशाने नीरजा हा चित्रपट पाहण्यास पसंती दिली होती. या तरुणीने वयाच्या २२व्या वर्षी दहशतवाद्यांचा सामना करून अनेक जीवांचे प्राण वाचवले. ही तरुणी म्हणजे नीरजा भनोट. नीरजा ही पॅन अॅम कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम करत होती. ५ सप्टेंबर १९८६ रोजी पॅन अॅम ७३ या विमानचे अपहरण झाले. त्यावेळी प्रवाशांना वाचविताना नीरजाचा मृत्यू झाला. तिच्या बुद्धिचातुर्याने तिने ४०० जणांचे जीव वाचविले होते. या दिवसाला ३३ वर्ष आज पूर्ण झाली आहेत.

- Advertisement -

नीरजाचा ७ सप्टेंबर १९६३ मध्ये चंदीगड येथे जन्म झाला. तिचे वडील हे पत्रकार होते तर आई गृहिणी होती. तसेच तिला दोन भाऊ आहेत. तिचे दोन्ही भाऊ तिला प्रेमाने ‘लाडो’ हा नावाने बोलवत असतं. नीरजाचं पूर्ण शिक्षण हे चंदीगढमध्ये झालं आहे. नीरजा ही खूप सुंदर मुलगी होती. म्हणून ती गोदरेज आणि फोरहॅन्स सारख्या ब्रँडची मॉडेल होती.

- Advertisement -

वयाच्या १९ व्या वर्षी तिने एका इंजिनिअर असलेल्या मुलासोबत लग्न करून ती संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहायला गेली. मात्र, हुंड्यासाठी छळ केल्यामुळे अवघ्या दोन महिन्यात तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर ती मुंबईमध्ये परतली आणि पॅन अॅम कंपनीत रुजू झाली.

नीरजाने ५ सप्टेंबर १९८६ रोजी ४०० जणांचे जीव वाचविले. तिच्या या धाडसामुळे तिला (मरणोत्तर) अशोक चक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या हल्लातील वाचलेल्या लोकांनी तिला ‘हिरोईन ऑफ दि हायजॅक’, असं संबोधलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -