घरताज्या घडामोडीभाजप नेत्याने Amazon वरून ३० हजार रुपयांचा मागवला साऊंड सिस्टीम, बॉक्स उघडल्यावर...

भाजप नेत्याने Amazon वरून ३० हजार रुपयांचा मागवला साऊंड सिस्टीम, बॉक्स उघडल्यावर पुढे काय घडलं ते पाहा?

Subscribe

या डिजिटल युगात सर्व काही ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. यावेळी रेवाडीतील भाजप नेते सुनील मुसेपूर हे ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरले आहेत. त्यांनी ऑनलाईन अॅमेझॉन शॉपिंग साइटवरून ३० हजार रुपये किमतीची साऊंड सिस्टीम खरेदी केली होती. मात्र, त्यांच्या या सामानाची डिलिव्हरी झाल्यानंतर आणि ते बॉक्स उघडल्यानतंर त्यामधून रद्दीच्या वस्तू बाहेर आल्या आहेत. बॉक्सच्या आत एक जुना स्पीकर आणि पुठ्ठा होता.

रेवाडी शहरातील सेक्टर १ मध्ये राहणारे भाजप नेते सुनील मुसेपूर यांनी काही दिवसांपूर्वी लोकप्रिय शॉपिंग साईट amazon वरून सुमारे ३० हजार किमतीची साऊंड सिस्टम ऑर्डर केली होती. आज डिलिव्हरी बॉय व्हॅनमध्ये सामान पोहोचवण्यासाठी आला होता. ऑनलाईन फसवणुकीचे किस्से भाजपच्या नेत्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी डिलिव्हरी बॉयला बॉक्स उघडायला दिला. परंतु त्याने बॉक्स उघडल्यानंतर जे पाहिले ते पाहून तो थक्क झाला.

- Advertisement -

बॉक्समधील साऊंड सिस्टीम वाजवण्याऐवजी रद्दी बाहेर आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचला आणि तक्रारीच्या आधारे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचवेळी डिलिव्हरी बॉय संदीपने सांगितलं की, आम्हाला कंपनीच्या गोदामातून माल डिलिव्हरी करायला सांगितला जातो. त्याप्रमाणे आम्ही तो बॉक्स डिलिव्हरी करतो. मात्र, बॉक्सच्या आत काय असते याची आम्हाला जाणीव नसते. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा : भाजप-राष्ट्रवादीच्या २०१७ मधील छुप्या युतीची माहिती नव्हती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -