भाजप-राष्ट्रवादीच्या २०१७ मधील छुप्या युतीची माहिती नव्हती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

राज्यात २०१७ मध्ये भाजप-राष्ट्रवादी युती करण्याचा प्रयत्न होता यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. या मुद्द्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया यापूर्वी दिल्या आहेत. यामध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. २०१७ मध्ये भाजप-राष्ट्रवादीच्या छुप्या युतीबाबत आपल्याला माहिती नव्हती असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. भाजप-शिवसेना युती असताना राष्ट्रवादीचा पर्याय आला नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच सध्या महाविकास आघाडी सरकारचे काम पाहून विरोधकांना आश्चर्य वाटत असेल असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी-भाजपच्या युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, २०१७ मध्ये छुपे काय चालले आहे याबाबत शिवसेनेला काही माहिती नव्हते. तीन पक्षाची युती होईल असे काही त्यावेळी सांगण्यात आले नव्हते. मला खोटं बोलायचे नाही माझी राजकीय कारकिर्द युतीमध्ये झाली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती २५ वर्ष घट्ट झाली होती. तसेच राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हा पर्याय त्यावेळी नव्हता. २०१७ मध्ये नक्की काय होतं की, त्यांना त्यांच्याशी युती करायची होती. महापालिकेच्या निवडणुका होत्या, शिवसेना भाजपची युती तुटली होती. मग तीन पक्षाच्या युतीचा प्रश्न कुठे येतो असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

तिघं एकत्र आलो हे आश्चर्य वाटत होतं

पूर्वी दोन विरुद्ध दोन होते परंतु मला पुन्हा तो इतिहास उगाळायचा नाही आहे. तिघ एकत्र आलो हे आश्चर्य वाटत होत. परंतु आता अर्धा कालखंड झाला असून सक्षम काम करत आहे म्हणून काही लोकांना आणि विरोधकांना आश्चर्य वाटत आहे. हे त्यांना आश्चर्याचे धक्के आहेत. हा धक्का निवडणुकीनंतरही राहील. जोपर्तंयत एकमेकांच्या मनात पाप येत नाही. मित्र म्हणायचा आणि पाठीत वार करायचा हा विचार कोणाला येत नाही तोपर्यंत वेगळं होणार नाही. भाजपसोबत आम्ही सुद्धा २५ वर्ष एकत्र होतो. वेगवेगळे चटके फटके खातच होतो असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

झेंडेधाऱ्यांची ओळख आणि अस्तित्व दाखवण्याची लढाई

हिंदुत्वादी सगळेच बोलत आहेत त्यामुळे शिवसेनेला कसं ओळखायचे असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनवा करण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ओळखण्याची गरज नाही. शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांनी सांगितले होते की हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. त्यामुळे आम्ही हिंदुत्वाचा डंका वाजवून सांगत नाही बसत आम्ही हिंदू आहोत. का असं तुम्हाला सांगावे लागतात, का तुमच्या झेंड्यांचे रंग बदलत आहेत. कधी या रंगाचा कधी त्या रंगाचा, असे का करावे लागत आहे. आम्ही कधीच झेंडा बदलत नाही आहे. दरवेळेला जन्मापासून नवीन झेंडेधारी आहेत त्यांना ओळख आणि अस्तित्व दाखवण्याची लढाई, अस्तित्व टिकवण्याची वेगळीच परंतु आमचे अस्तिव्त आहे. असे ज्यांना करावे लागत आहे. त्यांचे ठिक आहे. त्यांचा हक्का आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. पहिल्यापासून काही लोकांचा प्रवास पाहिला तर मशिदीमधून बाहेर पडताना त्यांचे फोटो आहे. कधी हिंदुंसोबत आहेत. मी कशाला लक्ष देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.


हेही वाचा : नोटबंदी, लॉकडाऊनसारखे ‘भोंगाबंदी’ देशभरात करा ना, मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारवर निशाणा