घरदेश-विदेशहुज्जत घालत रिक्षाचालकाने हत्या केली; प्रत्यक्षदर्शीनी हत्येचे काढले व्हिडिओ

हुज्जत घालत रिक्षाचालकाने हत्या केली; प्रत्यक्षदर्शीनी हत्येचे काढले व्हिडिओ

Subscribe

रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ही घटना प्रत्यक्षपणे पाहिली. परंतु, कुणीही हत्या करणाऱ्या रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट काही लोकांनी या हत्येचा व्हिडिओ शूट केले.

बुधवारी संध्याकाळी हैदराबादच्या मदीना चौकावर भर गर्दीमध्ये एका रिक्षा चालकाने धारधार शस्त्राने एका व्यक्तीची हत्या केली आहे. गेल्या एक महिन्यापूर्वीही अशीच एक घटना हैदराबादमध्ये घडली होती. भर दिवसा रस्त्यावर एका इसमाने हत्या केली होती. आता पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे हैदराबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना भर गर्दीत घडली. यावेळी रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ही घटना प्रत्यक्षपणे पाहिली. परंतु, कुणीही हत्या करणाऱ्या रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट काही लोकांनी या हत्येचा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केले. हे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. हत्या करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव मोहम्मद अब्दुल खाजा (३०) असे आहे. खाजाने शाकीर कुरेशी (३५) नावाच्या व्यक्तीची हत्या केली आहे.

हेही वाचा – जेलमधून पळाला आणि त्याचा खून झाला!

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण?

शाकीर कुरेशीने आपली रिक्षा खाजाला भाड्याने दिली होती. खाजाने ती रिक्षा दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या कुरेशीने खाजाला भेटण्यासाठी त्याचे घर गाठले. कुरेशीला घरी खाजा भेटला नाही. परंतु, त्याच्या घरच्यांशी बोलताना त्याने अपशब्दांचा प्रयोग केल्याची माहिती, खाजाने पोलिसांना दिली आहे. त्यानंतर या दोघांमधील वाद संपावा यासाठी बुधवारी संध्याकाळी ते मदीना चौकावर भेटले. याठीकाणी त्यांच्यातील वाद निवळण्याएवजी आणखी वाढला. या भांडणामध्ये खाजाने धारधार शस्त्र काढले आणि कुरेशीच्या पोटात घातले. खाजाने चार ते पाच वेळा कुरेशीवर हल्ला केला. या हल्यात कुरेशीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी ही सर्व घटना बघितली. परंतु, कुणीही या घटनेत मध्यस्थी केली नाही. उलट लोकांनी या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ काढले. लोकांकडून व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, खाजाने कुरेशीची हत्या केल्यानंतरही त्याला जोरजोरात लात मारली आहे. तो कॅमेऱ्याकडे बघून सांगत आहे की, आता त्याला फाशी दिली तरी चालेल. या घटनेविषयी माहिती पोलिसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच खाजाला अटक केली.


हेही वाचा – प्रियकराचा खून, तुकडे करून शिजवली बिर्याणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -