घरदेश-विदेशकेदारनाथ मंदिराचे दरवाजे आजपासून बंद; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

केदारनाथ मंदिराचे दरवाजे आजपासून बंद; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

Subscribe

11 वे ज्योतिर्लिंग म्हणून जगप्रसिद्ध असलेले भगवान केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी 8.30 वाजता पूजाविधी करत हे दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी जवळपास तीन हजारांहून अधिक भाविकांना दरवाजे बंद करण्याचा अनुभव घेता आहे. आता पुढील सहा महिने उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात केदारनाथेची पूजा व दर्शन घेता येणार आहे. केदारनाथ मंदिर आज पहाटे तीन वाजता उघडले आणि 4 वाजता प्रभूचा विधीवत अभिषेक करत मंदिराचे दरवाजे बंद करण्याची समाधी पूजा प्रक्रिया सुरु झाली. पुजारी टी गंगाधर लिंग यांनी भगवान केदारनाथच्या स्वयंभू ज्योतिर्लिंगाला समाधी दिली. यावेळी ज्योतिर्लिंगावर भृंगराजची फूलं, भस्म, स्थानिक फुलं आणि पानांचा अभिषेक करण्यात आला. यानंतर केदारनाथाची डोली मंदिराबाहेर येऊन भाविकांनी भव्य दर्शन दिले.

यानंतर मंदिराच्या मुख्य दरवाजासह मागील दरवाजे पारंपारिक पूजाविधी करत बंद करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी श्री केदारनाथ धामचे दरवाजे बंद केल्याच्या निमित्ताने यात्रेकरूंचे आभार मानले. केदारनाथच्या चारधाम यात्रेसाठी जवळपास पंचेचाळीसहून अधिक भाविकांनी आत्तापर्यंत हजेरी लावली होती. यानंतर चारधामवरून केदारनाथांची फिरती डोली हिवाळीस्थळी निघाली. यावेळी केदारनाथ यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. आतापर्यंत 15.55 लाखांहून अधिक भाविक केदारनाथ धामला पोहोचले आहेत.

- Advertisement -

बुधवारी विशेष पूजा झाल्यानंतर केदारनाथांची पंचमुखी डोली मंदिरात विराजमान करण्यात आली. तर दुसरीकडे भाविक पारंपारिक गाणी आणि झुमेळांचा गजर करत जल्लोषात नाचताना दिसले. यानंतर केदारनाथांची पंचमुखी भोग मुर्तींना उत्सव डोळीत विराजमान करण्यात आली, यानंतर विधिवत पूजा करून केदारनाथांची डोली मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान केदारनाथांची ही फिरती उत्सव डोली आता रामपूरमध्ये पहिला मुक्काम करेल, यानंतर 28 ऑक्टोबर रोजी डोली फाटा मार्गे विश्वनाथ मंदिर गुप्तकाशीत रात्रीच्या विश्रांतीसाठी पोहोचेल. 29 ऑक्टोबर रोजी गुप्तकाशीतून ही डोली प्रस्थान करत रात्री 12 वाजता श्री पंचकेदार गद्दीस्थळ आोंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथे पोहोचेल.

केदारनाथ धामच्या सर्व परंपरा आणि पद्धती लक्षात घेऊन बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना जिल्हा दंडाधिकारी मयूर दीक्षित यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. 26 ऑक्टोबर गोवर्द्धन पूजेच्या निमित्ताने श्री गंगोत्री धामचे मंदिर हिवाळ्यासाठी बंद करण्यात आले. ज्यानंतर आज श्री यमुनोत्री धाम मंदिराचे दरवाजेही हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बंद राहतील.


बीसीसीआयची मोठी घोषणा, पुरुष- महिला क्रिकेटर्सला मिळणार समान मानधन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -