घरठाणेजितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य आक्षेपार्ह, संवेदनशीलपणे बोलावं - देवेंद्र फडणवीस

जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य आक्षेपार्ह, संवेदनशीलपणे बोलावं – देवेंद्र फडणवीस

Subscribe

'दंगलींसाठी राम नवमी आणि हनुमान जयंती साजरी केली जाते असे म्हणणे एकप्रकारे समजाचा अपमान आहे. राम भक्तांचाही अपमान आहे. त्यामुळे असे वक्तव्य करणे चुकीचे आहे', अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले.

‘दंगलींसाठी राम नवमी (Ram Navami) आणि हनुमान जयंती (Hanuman Jayanti) साजरी केली जाते असे म्हणणे एकप्रकारे समजाचा अपमान आहे. राम भक्तांचाही अपमान आहे. त्यामुळे असे वक्तव्य करणे चुकीचे आहे’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना प्रत्युत्तर दिले. रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात असे, वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. (NCP Jitendra Awhad statement offensive speak sensitively says DCM Devendra Fadnavis)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घाटकोपरमध्ये सभेत बोलताना आव्हाडांनी हे विधान केले. या विरोधात भाजप मुंबईमध्ये आक्रमक झाली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“हे विधान आक्षेपार्ह आहे. राम नवमी आणि हनुमान जयंती ही अत्यंच शांततेने साजरी केली जाते. लोकांच्या मनात प्रभू श्री राम आणि हनुमानाच्या प्रती प्रचंड श्रद्धा आहे. ती श्रद्धा यानिमित्ताने व्यक्त केली जाते. त्यामुळे दंगलींसाठी राम नवमी आणि हनुमान जयंती साजरी केली जाते असे म्हणणे एकप्रकारे समजाचा अपमान आहे. राम भक्तांचाही अपमान आहे. त्यामुळे असे वक्तव्य करणे चुकीचे आहे”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

“महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील या वक्तव्याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा. दंगली घडवण्याबाबत तुम्ही ठरवलं आहेत का? अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे का? असाही सवाल आमच्या समोर उपस्थित होत आहे. त्यामुळे नेत्यांनी अशा प्रकरणात संवेदनशील वागलं पाहिजे आणि संवेदनशीलरित्या बोलले पाहिजे. सनसनाटी निर्माण करणे योग्य नाही”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – मी कारखानदार पण अजित पवारांसारखा नाही, ठाण्यातील कार्यक्रमात तानाजी सावंतांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -