घरताज्या घडामोडीRussia-Ukraine crisis: युद्ध टळले! रशियाने यूक्रेनच्या सीमेवरून सैन्य मागे घेण्याची केली घोषणा

Russia-Ukraine crisis: युद्ध टळले! रशियाने यूक्रेनच्या सीमेवरून सैन्य मागे घेण्याची केली घोषणा

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि यूक्रेनच्या सीमेवर तणाव वाढला होता. मात्र आता तो कमी होताना दिसत आहे. रशियाने यूक्रेन सीमेवरून सैन्य मागे घेण्याची घोषणा केली आहे. तसेच आता क्रीमियाहून रशियाचे सैन परतत आहेत. रशिया आणि यूक्रेनमध्ये काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच १६ फेब्रुवारीला म्हणजेच आज रशिया यूक्रेनवर हल्ला करू शकतो असे म्हटले जात होते. अमेरिका या वादाच्या सुरुवातीपासून रशियाला हल्ला न करण्यासाठी दबाव टाकत होते. पण यादरम्यान सैन्य माघार घेत असल्याची दिलासादायकबाब समोर आली आहे.

- Advertisement -

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सैनिक परतत असल्याचा व्हिडिओ जारी केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये सैन्य वाहन आणि टँक क्रीमियातून बाहेर पडताना दिसत आहे. तसेच आता सैनिक आपल्या पूर्वीच्या ठिकाणी जात आहेत.

दरम्यान रशियाने एक दिवसापूर्वी यूक्रेनच्या सीमेवरून आपले काही सैनिक मागे बोलावल्याचा दावा केला होता. रशियाच्या या दाव्यावर अमेरिकेसोबत इतर राज्यांनी अविश्वास दाखवला होता. यूक्रेन म्हणाले होते की, ‘त्याला ऐकण्यावर नाही, तर कृती पाहण्यावर विश्वास आहे.’ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचा हा दावा मान्य करण्यास नकार देत पुरावे मागितले होते.

- Advertisement -

अमेरिककडून असे म्हणण्यात आले होते की, ‘रशियाने कुठून किती सैनिक मागे घेणार याबाबत माहिती दिली नाही दिली.’ आता रशियाने सैनिक मागे घेतल्याचा व्हिडिओ जारी केला आहे. यापूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि जर्मन चांसलर यांची भेट झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेदरम्यान रशियाचे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले होते की, आम्ही युद्ध करू इच्छित नाही.


हेही वाचा – Russia-Ukraine Conflict: यूक्रेनमध्ये तणाव अन् परिणाम भारतात, पेट्रोल-डिझेल, सोन्यासोबतच सर्वसामान्यांच्या कोणत्या गोष्टी महागणार?


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -