घरताज्या घडामोडीIndian Railway : राजधानी ट्रेनचा प्रवास होणार सुखकर ; आधुनिक तेजस डब्यांसह...

Indian Railway : राजधानी ट्रेनचा प्रवास होणार सुखकर ; आधुनिक तेजस डब्यांसह ४ राजधानी एक्सप्रेस सुरु

Subscribe

प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव द्विगुणित करण्यासाठी एक आमूलाग्र बदल भारतीय रेल्वेने केला आहे.

भारतीय रेल्वेने राजधानी एक्स्प्रेसच्या डब्यांचे नवीन आधुनिक तेजस गाड्यांमध्ये रूपांतर करून अधिक आरामदायी सोयीसुविधांसह रेल्वे प्रवासाचे नवे युग सुरू केले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या आधुनिक तेजस स्लीपर प्रकारातील गाड्या हा प्रवासाचा अनुभव द्विगुणित करण्यासाठी एक आमूलाग्र बदल आहे.सध्या, भारतीय रेल्वे तेजस स्लीपर कोचेससह चार राजधानी गाड्या चालवत आहे.तेजस डब्यांसह सुधारित पहिली राजधानी गाडी दिल्ली-मुंबई मार्गावर पश्चिम रेल्वेने जुलै २०२१ मध्ये चालवली होती.

भारतीय रेल्वेच्या एलएचबी प्लॅटफॉर्मवर स्लीपर कोचसह अत्याधुनिक तेजस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक गाड्यांमध्ये पुढील प्रमुख ठळक वैशिष्ट्ये आहेत:-

- Advertisement -
  • स्वयंचलित प्रवेश दरवाजे
  • PA/PIS (प्रवासी घोषणा/प्रवासी माहिती प्रणाली)
  • आग आणि धूर शोध आणि शमन प्रणाली
  • सीसीटीव्ही कॅमेरे
  • सुधारित शौचालय- जैव-शौचालयांसह व्हॅक्यूम असिस्टेड फ्लशिंग, उच्च दर्जाची टॉयलेट फिटिंग, टच फ्री सोप
  • डिस्पेंसर, बसण्यासाठी विशेष कक्ष
  • एलईडी दिवे
  • सुरेख रंगसंगती

‘या’ राजधानी ट्रेन केल्या अपग्रेड

ट्रेन नंबर – २०५०१ /०२ अगरतला – आनंद विहार राजधानी एक्सप्रेस
ट्रेन नंबर- १२९५१/५२ मुंबई-नई दिल्ली राजधानी एक्सप्रेस
ट्रेन नंबर- १२९५३/५४ मुंबई-निजामुद्दीन अगस्त क्रांति राजधानी
ट्रेन नंबर- १२३०९/१० राजेंद्र नगर-नई दिल्ली (पटना राजधानी) एक्सप्रेस


हे ही वाचा – नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकतर्फी विजय भाजपचा होणार, नारायण राणेंचा दावा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -