घरदेश-विदेश'सनातनचे देशाविरोधात छुपे युद्ध'

‘सनातनचे देशाविरोधात छुपे युद्ध’

Subscribe

सनातनने देशाविरोधात छुपे युद्ध पुकारले आहे. आत्तापर्यंतच्या कारवायांमध्ये सनातनचे नाव आले. पण, त्यानंतर देखील सरकार काहीच कारवाई करत नाही. अशा शब्दात विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकार आणि सनातनला लक्ष्य केले.

अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दोभालकरांच्या मारेकऱ्यांना विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सनातनवर जोरदार हल्ला चढवला आहे. वैभव राऊतकडे सापडलेले 20 बॉम्ब, 21 गावठी पिस्तुले दिवाळी साजरी करायला आणलेले नव्हते. बकरी ईद,गणेशोत्सवासारख्या धार्मिक सणांमध्ये बॉम्ब फोडून त्यांना धार्मिक हिंसाचार घडवायचा होता. मराठा क्रांती मोर्चामध्ये बॉम्ब फोडून राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात आणायचा होता. या साऱ्या बाबी देशाविरूद्ध छुपे युद्ध पुकारल्यासारख्या आहेत. यानंतर देखील या संस्थेवर बंदी का घालत नाही? असा सवाल देखील विरोधपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शस्त्रे व बॉम्बसाठा सापडतो. तरूणांना फितवून शस्त्रांस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते. संशयित मारेकऱ्यांच्या डायरीत पुरोगामी चळवळीतील विचारवंतांची ‘हिटलिस्ट’ सापडते. देशविघातक कारवायांचे एवढे पुरावे हाती लागल्यानंतरही सरकार गप्प आहे. सुरूवातीला विचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या. आता सामूहिक हत्यांचा कट रचला जातो आहे. असे देखील विखे-पाटील यांनी म्हटले.

वाचा – वैभव राऊतचा सनातनशी संबंध तपासानंतरच कळेल – दीपक केसरकर

कार्यपद्धती ‘अल कायदा’सारखीच!

यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सनातनची तुलना अल कायदा या दहशतवादी संघटनेशी केली. या संघटनांचे काम ‘अल कायदा’सारख्या दहशतवादी संघटनांच्या तोडीचे आहे. गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. प्रत्यक्ष हल्ला करणारे वेगळे, त्यांना शस्त्रे देणारे वेगळे, हत्येची योजना आखणारे वेगळे आणि कुणाची हत्या करायची, हे ठरविणारेही वेगळेच आहेत. प्रत्येकाला त्याची जबाबदारी ठरवून दिलेली असते. त्याशिवाय त्याला काहीच माहिती नसते. त्यामुळेच डॉ. दाभोलकर व कॉम्रेड पानसरेंच्या हत्या प्रकरणात अनेकांना अटक झाल्यानंतरही आजवर संपूर्ण कट उघडकीस येऊ शकलेला नाही.

- Advertisement -

‘ब्रेन वॉश’ करणारे ‘महागुरू’ कोण?

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये चार विचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या. या हत्याकांडातील चारही आरोपी सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांची पार्श्वभूमी काही गुन्हेगारी स्वरूपाची नाही. कपड्याच्या दुकानात काम करणारा सचिन अंदुरे आणि ‘लेथ मशीन’वर काम करणाऱ्या शरद कळसकरचा डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी काहीही संबंध नव्हता. पण, त्यानंतर देखीत त्यांच्याकडे पिस्तुल सापडते. थंड डोक्याने दाभोलकरांची हत्या करण्यात येते. यासाठी ब्रेन वॉश करण्यात येतो. यागील मुख्य सुत्रधार शोधण्याची गरज असल्याचे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

वाचा – CBIनं नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्याला केली अटक

डॉ. जयंत आठवले गप्प का?

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रोफेसर एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील मास्टर माईंडला अटक करण्याची गरज आहे. या चारही हत्याकांडामध्ये सनातनचे नाव येते. पण संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले काहीच का बोलत नाहीत? असा सवाल देखीलव विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -