घरदेश-विदेशउद्या हे जो बायडनची पार्टीसुद्धा फोडतील; संजय राऊतांची मिश्कील टीका

उद्या हे जो बायडनची पार्टीसुद्धा फोडतील; संजय राऊतांची मिश्कील टीका

Subscribe

उद्वव ठाकरे यांचा कार्यकाळ संपत आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात निर्णय दिलेला नाही. यावर खासदार राऊत म्हणाले, बाळासाहेब हे शिवसेना प्रमुख होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ते पद कायम ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत व तेच राहतील, असा दावा खासदार राऊत यांनी केला.

जम्मू-काश्मिरः उद्या जाऊन हे जो बायडनची पण पार्टी फोडतील, अशी मिश्किल टीका ठकारे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी शिंदे-फडणवीस यांच्यावर केली.

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत खासदार राऊत सहभागी झाले होते. त्यानंतर खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शिवसेना फुटीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, उद्या ते जो बायडनची पार्टी जाऊन फोडतील. त्यामुळे त्यांचा विषय सोडून द्या. शिवसेना ही एकच आहे. दुसरी शिवसेना होऊ शकत नाही. काही खासदार व आमदार फुटले म्हणून शिवसेना संपत नाही. शिवसेना जमीनीवर आहे. गेले तीन ते चार महिने निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. त्यावर निकाल लागत नाही. याबाबत दबाव तंत्र वापरले जात आहे.

- Advertisement -

उद्वव ठाकरे यांचा कार्यकाळ संपत आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात निर्णय दिलेला नाही. यावर खासदार राऊत म्हणाले, बाळासाहेब हे शिवसेना प्रमुख होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ते पद कायम ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत व तेच राहतील, असा दावा खासदार राऊत यांनी केला.

पुढे खासदार राऊत म्हणाले, गेली पंधरा ते वीस वर्षे जम्मू-काश्मिरमधील ज्वलंत प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही. काश्मिरी पंडीत, येथील विस्थापीत, निर्वासित यांचे प्रश्न सोडवलेले नाहीत. घर वापसी होणार होती. कुठे झाली घर वापसी. काश्मिरच्या मुद्द्यावर भाजपने मते मागितली. निवडून आल्यानंतर काश्मिरचे प्रश्न काही भाजपने सोडवले नाहीत. जम्मू-काश्मिरमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुटलेला नाही. येथील निवडणुका झालेल्या नाहीत. मुख्यमंत्री निवास रिकामे आहे. तेथे काय चालते माहित नाही, असा आरोप खासदार राऊत यांनी केला.

- Advertisement -

शिवसेना जम्मू-काश्मिरमधील निडवणूक लढवणार आहे. आमचा जाहिरनामा नसतो. आमचा वचननामा असतो. येथील तरुणांना रोजगार देण्यासाठी व अन्य मुळ प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना तत्पर असेल, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

 

तिसरी आघाडी नाही चालणार

भाजप विरोधात तिसऱ्या आघाडीचा पर्याय आहे का?, या प्रश्नावर खासदार राऊत म्हणाले, कॉंग्रेस शिवाय कोणतीही आघाडी चालणार नाही. याआधीही तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न फसले आहेत. कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही. भाजपची सत्ता गेल्यानंतर पंतप्रधान कोण होणार याचा निर्णय लोकशाही मार्गाने होईल. मात्र राहुल गांधी हे नेतृत्त्व करु शकतात. त्यांनी त्यांची प्रतिमा बदलली आहे, असे राऊत यांनी सांगितले.

देव चोरणारे देव होत नाही

मंदीरातील देव चोरले जातात. त्याप्रमाणे बाळासाहेबांना चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. पण बाळासाहेबांना चोरून ते देव होणार नाहीत. जेथे ठाकरे आहेत तिच शिवसेना खरी आहे. त्यामुळे ठाकरे यांचीच शिवसेना खरी आहे, असा दावा खासदार राऊत यांनी केला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -