घरदेश-विदेशसंजय राऊतांना राज्यसभेत दाखवली नवी जागा; राऊतांचा संताप

संजय राऊतांना राज्यसभेत दाखवली नवी जागा; राऊतांचा संताप

Subscribe

खासदार संजय राऊत यांची राज्यसभेतली जागा बदलल्यामुळे त्यांनी सभापती वेंकैया नायडू यांना खरमरीत पत्र लिहिली आहे.

भाजपवर गेल्या काही दिवसांपासून रोज तुटून पडणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भाजपने राज्यसभेत जागा दाखवल्यामुळे राऊत चांगलेच भडकले आहेत. संजय राऊत राज्यसभेत खासदार आहेत. ज्येष्ठतेनुसार त्यांना आतापर्यंत राज्यसभेच्या तिसऱ्या रांगेत बसायला मिळत होते. मात्र आज त्यांना पाचव्या रांगेत बसायला सांगितल्यामुळे राऊत यांचा चांगलाच भडका उडाला. ‘भाजपप्रणीत एनडीएने या कृतीतून माझा आणि शिवसेनेचा अपमान केला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यानंतर त्यांनी राज्यसभेचे सभापती वेंकैया नायडू यांना खरमरीत पत्र लिहून आपली नाराजी प्रकट केली.

या पत्रामध्ये राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या भावना दुखावण्यासाठी आणि आमचा आवाज दाबण्यासाठी कुणीतरी जाणूनबुजून हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, “मला आठवतं जेव्हा एनडीए विरोधी पक्षात होती तेव्हा देखील माझ्या ज्येष्ठतेनुसार माझी जागा तिसऱ्या रांगेत होती. मात्र आता मला पाचव्या रांगेत बसविण्यात आले आहे. याचाच अर्थ कुणीतरी हे मुद्दामहून शिवसेनेचा आवाज कमजोर करण्यासाठी करत आहे.”

- Advertisement -

शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याची कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही. मग अचानक जागा बदलण्याचा हेतू काय असू शकतो? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच या कृतीमुळे राज्यसभेच्या सभागृहाचाही अवमान झाला आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा मला तिसऱ्या रांगेत जागा देऊन सभागृहाची सभ्यता पाळावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -