घरदेश-विदेशSBI कार्डधारकांनो 'दमदार दस' ऑफरमधून शॉपिंग करत मिळवा जबरदस्त कॅशबॅक

SBI कार्डधारकांनो ‘दमदार दस’ ऑफरमधून शॉपिंग करत मिळवा जबरदस्त कॅशबॅक

Subscribe

भारतातील सर्वात मोठी क्रेडिट कार्ड कंपनी एसबीआय कार्डने (SBI) ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी खास ‘दमदार दस’ ही फेस्टिव्हल ऑफर जाहीर केली आहे. तीन दिवसांची ही मेगा शॉपिंग फेस्टिव्हल ऑफर ३ ऑक्टोबरपासून सुरु होईल. या शॉपिंग फेस्टिव्हलदरम्यान एसबीआय कार्ड धारकांना कोणत्याही घरगुती ई-कॉमर्स वेबसाईटवरुन वस्तू खरेदी करण्याचे स्वातंत्र्य असेल. यावेळी खरेदीवर ग्राहकांना १० टक्के कॅशबॅक (Cashback offer) मिळणार आहे. त्यामुळे कॅशबॅकसाठी ग्राहकांना आता मर्यादीत वेबसाईटवर अवलंबून राहण्याची गरज नाही. विशेष म्हणजे ईएमआय (EMI) पेमेंटची वाढती लोकप्रियता पाहता आता ही ऑफर व्यापारी ईएमआय व्यवहारांवर देखील उपलब्ध असेल. या माध्यमातून ग्राहक सुरक्षित आणि सोयस्कररित्या पेमेंट करु शकतील.

कोणत्याही वेबसाईटवरून खरेदी करत मिळवा कॅशबॅक 

एसबीआय कार्ड (SBI Card) फेस्टिव्हल ऑफर 2021 वर बोलताना एसबीआय कार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राममोहन राव अमारा म्हणाले, या ऑफर्स जाहीर करण्यासाठी आम्ही सर्वेक्षण डेटावर पुरेपूर विश्वास ठेवतो. यावेळी आमच्या लक्षात आले की, जास्त जास्त कार्डधारक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून वेगवेगळ्या प्रकारची ऑनलाईन खरेदी करत आहेत. विशेषत: सणासुदीच्या काळात ही संख्या आणखी वाढते.

- Advertisement -

पेमेंट करणं होणार सोप्पे

ग्राहक केंद्रस्थानी असल्याने ग्राहकांच्या वाढत्या गरजांनुसार ऑफर्सचा शोध घेतआहोत. या एसबीआय कार्ड फेस्टिव्हल ऑफर 2021 (SBI festive cashback offer 2021) ही ग्राहकांच्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी तसेच त्यांच्या उत्सवाचा आनंद आणखी वाढवण्यासाठी एक विचारशील ऑफर आहे. या ऑफरद्वारे ग्राहकांना सोयीस्कर, सुलभ, सुरक्षित पद्धतीने पेमेंट करु शकतील. यात ते पुढे म्हणाले की, सुसंगत आणि सुरक्षित पद्धतीने कधीही, कुठेही पेमेंट करण्याची सुविधा प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

SBI कार्डने सुरु केली ‘डिजिटल मोहीम’

फेस्टिव्हल ऑफर 2021 (festive cashback offer 2021) द्वारे ग्राहकांना अधिक आकर्षक करण्यासाठी, SBI कार्डने डिजिटल मोहीम सुरू करण्याची योजना आखली आहे. या मोहिमेत अभिनेता जावेद जाफरी दिसणार आहे. भारतातील सर्व एसबीआय कार्ड ग्राहक ३ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणाऱ्या या एसबीआय कार्ड फेस्टिव्ह ऑफर २०२१ चा लाभ ग्राहक घेऊ शकणार आहेत.

- Advertisement -

‘या’ वस्तूंवर मिळवा कॅशबॅक ऑफर 

ही कॅशबॅक ऑफर मोबाईल फोन आणि अॅक्सेसरीज, टीव्ही आणि मोठी उपकरणं, लॅपटॉप आणि टॅब्लेट, होम फर्निशिंग, किचन उपकरणं, फॅशन आणि लाइफस्टाइल, स्पोर्ट आणि फिटनेस यासारख्या उत्पादनांच्या खरेदीवर मिळणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -