घरदेश-विदेशमुलाचे लग्नाचे वय एकवीसच राहणार

मुलाचे लग्नाचे वय एकवीसच राहणार

Subscribe

मुलासाठी लग्नाचे वय २१च राहणार असे सांगत वय कमी करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसेच कोर्टाचा वेळ घालवल्याबद्दल याचिकाकर्त्यांना दंड ठोठावला आहे.

भारतात लग्नासाठी मुला-मुलीचे वय ठरवून दिलेले आहे. यामध्ये मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ ठरलेले आहे. मात्र मुलासाठी असलेले २१ हे वय कमी करुन १८ करावे अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. वय कमी करण्यामागे कोणताही तर्क लावलेला नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टाने सदर याचिका फेटाळून लावली आहे. तसेच याचिका दाखल करणारे वकिल अशोक पांडे यांना २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

- Advertisement -

याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगाई, न्यायाधीश एस. के. कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी कोर्टाने याचिकाकर्त्याच्या मागणीचा चांगलाच समाचार घेतला. याचिकाकर्त्याचे वय ५० असून त्याने लग्नाचे वय १८ करण्यामागे काहीच अर्थ नसून एखाद्या १८ वर्षाच्या मुलाने सदर मागणी केल्यास, त्याचा विचार करु असेही सांगितले.

बालविवाह प्रथा थांबवण्यासाठी बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यानुसार मुलींच्या लग्नाचे वय कायद्याने १८ आणि मुलाचे वय २१ असल्याचे सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -