घरताज्या घडामोडीCovid-19 - माणसांतून मांजरांमध्ये झाले कोरोनाचे संक्रमण!, नवा खुलासा

Covid-19 – माणसांतून मांजरांमध्ये झाले कोरोनाचे संक्रमण!, नवा खुलासा

Subscribe

काही दिवसांपूर्वी मांजरामुळे कोरोनाचे संक्रमण होते असे समोर आले होते. पण यामुळे एकच खळबळ माजली होती. परंतु आता माणसांतून मांजरांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाल्याचा नवा खुलासा झाला आहे. स्कॉटलँडच्या (Scotland) ग्लासगोमध्ये माणसांतून माजरांत कोरोना व्हायरसचे संक्रमण (Human To Cat Coronavirus Transmission) झाल्याचे प्रकरणे समोर आली आहे. यामुळे वैज्ञानिकांची चिंता वाढली आहे. ग्लासगो युनिव्हर्सिटीचे संशोधकांनी स्क्रिनिंग प्रोग्राम दरम्यान मांजरांमध्ये कोरोना व्हायरचे संक्रमण झाल्याचे आढळले.

माहितीनुसार ज्या दोन मांजरी कोरोनाबाधित आढळल्या आहेत, त्या दोन्ही वेगवेगळ्या घरातील होत्या. या दोन्ही मांजरींच्या मालकांना कोरोनाची लागण झाली होती. या दोन्ही मांजरींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर या मांजरीची कोरोना चाचणी केली आणि त्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

- Advertisement -

वेटरनरी रिकॉर्ड ( Veterinary Record) मध्ये आलेल्या अहवालानुसार, आतापर्यंत मांजरांमधून माणसांत कोरोनाचे संक्रमण झाल्याचे कोणतेही प्रकरण समोर आले नाही आहे. या अभ्यासात सांगितले की, प्राण्यांमधून माणसांमध्ये कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका नाही आहे.

दरम्यान वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, जरी प्राण्यांमध्ये माणसांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाल्याचे प्रकरण समोर आले नसले तरी प्राणी कोरोनाचे वाहक (Reservoir) म्हणून काम करतात आणि संक्रमणाची साखळी तयार करतात. जी मांजर कोरोना संक्रमित आढळली आहे, तिचा मालकाला मार्च २०२० मध्ये कोरोना झाला होता. संक्रमण झाल्यानंतर मांजरीला श्वास घेण्यास त्रास होत होता. पोस्टमार्टम अहवालातून समोर आले आहे की, कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मांजरीच्या फुफ्फुसात (Lungs) इन्फेशन झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – CSIR Serosurvey: धूम्रपान करणारे, शाकाहारी, O Blood Group असणाऱ्यांना कोरोनाचा धोका


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -