Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE CSIR Serosurvey: धूम्रपान करणारे, शाकाहारी, O Blood Group असणाऱ्यांना कोरोनाचा धोका कमी

CSIR Serosurvey: धूम्रपान करणारे, शाकाहारी, O Blood Group असणाऱ्यांना कोरोनाचा धोका कमी

पॅन इंडिया सेरोसर्वेने केलेल्या CSIR सर्वेमध्ये कोरोना विरुद्ध लढणाऱ्या अँन्टीबॉडीजचा अभ्यास करण्यात आला.

Related Story

- Advertisement -

देशात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोरोनाचा मोठा धोका आहे. मात्रCSIR सेरो सर्वेतून असे समोर आले आहे की धुम्रपान करणारे लोक त्याचप्रमाणे शाकाहारी लोकांना आणि ज्यांचा रक्तगट O आहे अशा लोकांना कोरोना विषाणूचा धोका कमी असल्याचे सर्वेक्षणात म्हणण्यात आले आहे. पॅन इंडिया सेरोसर्वेने केलेल्या CSIR (Council of Scientfic and Industrial Research) सर्वेमध्ये कोरोना विरुद्ध लढणाऱ्या अँन्टीबॉडीजचा अभ्यास करण्यात आला. त्याचप्रमाणे १४० डॉक्टर आणि शास्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार त्यांनी CSIR च्या ४०हून अधिक प्रयोगशाळांमध्ये आणि शहरी भागात त्याचबरोबर काही सेमी शहरी भागात काम करणाऱ्या १० हजार ४२७ प्रौढ व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांचा अभ्यास करण्यात आला.

धुम्रपान करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते असे आपल्याला वारंवार सांगण्यात येते मग धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा कमी धोका कसा संभवतो असा प्रश्न सर्वांनाच पडतो. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, कोरोना हा श्वसनाचा आजार आसूनही श्लेष्म उत्पादन वाढविण्यासाठी धुम्रपान महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र याविषयी आणखी अभ्यासाची आवश्यकता असल्याचे म्हटले गेले आहे. धुम्रपान आणि निकोटीनचा कोरोनावर काय परिणाम होतो हे समजण्यासाठीही अभ्यासाची गरज असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे सर्वेत असे देखिल म्हणण्यात आले आहे की, शाकाहारी लोकांनाही कोरोनाचा धोका कमी आहे. शाकाहारी लोकांना मोठ्या प्रमाणात फायबर मिळते. फायबरमुळेच त्यांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. तर O रक्तगट असलेल्या लोकांनाही कोरोना कमी धोक आहे. B आणि AB रक्तगट असलेल्यांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका असल्याचे म्हटले गेले आहे. सेरोने दिलेल्या अहवालात असे समोर आले आहे की AB रक्तगट असलेल्या लोकांमध्ये सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह समोर आले आहेत. त्यानंतर B रक्तगटात त्यापेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्ह समोर आले आहेत. मात्र O रक्तगट असणाऱ्या लोकांमध्ये फार कमी पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहे.


हेही वाचा – देशात कोरोनाचं थैमान सुरूच! गेल्या २४ तासात ३ लाख ४९ हजार नवे रुग्ण, २ हजारांहून अधिक बळी

- Advertisement -