घरदेश-विदेशभटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताला अटक

भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताला अटक

Subscribe

भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका ३५ वर्षीय विकृताला कोलकता पोलिसांनी अटक केली आहे. कुटुंबीय बाहेर गावी गेले असता कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. कोलकात्याच्या पिपीपुर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेनंतर परिसरातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कमलेश महतो विरोधात ३७७ (अनैसर्गिक संभोग) चा गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास या विकृताला पुढील आयुष्य तुरुंगातच काढावे लागेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अत्याचार करतेवेळी विकृताची पत्नी आणि तीन मुले बिहार येथे लग्नासाठी गेले होते.

कमलेश पेपर उत्पादन युनिटमध्ये मजूर म्हणून कार्यरत असून तो स्टाफ क्वार्टरमध्ये आपल्या कुटुंबासह रहातो. काही दिवसांसाठी याचे कुटुंबीय बिहार येथे लग्न समारंभासाठी गेले होते. त्यावेळी याने रस्त्यावरील एका कुत्र्याला कागदात गुंडाळून सरोवर परिसरात नेले. याच ठिकाणी त्याने कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले. लैंगिक अत्याचार करताना एका युवकाने त्याला बघीतले. या विकृताच्या तावडीतून कुत्र्याची सुटका करुन पोलिसांना या घटनेसंबधी माहिती दिली. घटनेनंतर कुत्र्याला उपचारासाठी प्राण्यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. पोलिसांनी सध्या कमलेशला ताब्यात घेतले असून त्याविरोधात पुरावे जमा करण्याचे काम सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -