घरताज्या घडामोडीपंतप्रधान किंवा UPA च्या नेतृत्वपदाच्या शर्यतीत शरद पवार नाहीत - नवाब मलिक

पंतप्रधान किंवा UPA च्या नेतृत्वपदाच्या शर्यतीत शरद पवार नाहीत – नवाब मलिक

Subscribe

उत्तर प्रदेशात सत्ता परिवतर्नासाठी शरद पवारांची जुळवाजुळव सुरू

लखीमपूर खिरी, उन्नावसारख्या घटनांमुळे उत्तर प्रदेशात अन्याय, अत्याचाराविरोधात वेगळी लाट निर्माण झाली आहे. पण भाजपचे लोक धर्माच्या नावावर भासवत आहेत की लोक आपल्यासोबत आहेत. ९३ नंतर दंगल उत्तर प्रदेशातही हिंसा भडकली होती. तेव्हा कल्याणसिंह सरकार बरखास्त केल्यावर भाजपला पराभव स्विकारावा लागला. धर्माच्या नावावर पाच वर्षात महिला, शेतकरी, दलित, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात आता लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. मंत्रीमंडळातील मंत्रीच भाजप सोडून बाहेर पडताहेत हेच परिवतर्नाचे वारे असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सध्या युपीएचे नेतृत्व कोणी करायचे हा मुद्दा नाही. तसेच पंतप्रधान शर्यतीतही शरद पवार नाहीत, असाही दावा त्यांनी केला. शरद पवार सत्ता परिवर्तनासाठी पुढाकार घेत असल्याचेही ते म्हणाले. मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर नवाब मलिक पत्रकारांसोबत बोलत होते.

भविष्यवाणी अमित शहा करत राहतील, पण आम्ही भविष्यवाणी करत नाही. आमच्याकडे ज्योतिषशास्त्रही नाही. त्यामुळे युपीमध्ये परिवतर्न होणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री राजीनामे देत आहेत हेच परिवर्तनाचे द्योतक असल्याचे ते म्हणाले. यामध्ये शरद पवार पंतप्रधान शर्यतीत नाहीत हे आधीच त्यांनी स्पष्ट केले आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या निमित्ताने सत्ता परिवतर्नसाठी शरद पवार हे पुढाकार घेणार आहेत असेही त्यांनी सांगितले. अखिलेश यादव यांचे समर्थन आहे. तसेच ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव आणि मायावती यांच्याशीही शरद पवारांचा चांगला संवाद आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या मदतीने या सत्ता परिवर्तनासाठी प्रयत्न करणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी याआधीही युपीएचे नेतृत्व नको असे स्पष्ट केले आहे. सध्या युपीएचे नेतृत्व कोण करणार हा महत्वाचा मुद्दा नाही. मात्र युपीएचे सध्या सामुहिक नेतृत्व असेल. उत्तर प्रदेशात जुळवाजुळव करण्याचे काम शरद पवार करत आहेत, असेही मलिकांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

याआधी दुपारी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत देशातील पाच राज्यांपैकी तीन राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असल्याचे स्पष्ट केले होते. उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस लढवणार असल्याचे शरद पवारांनी जाहीर केले होते. विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशात सत्तापरिवर्तन होईल असाही दावा त्यांनी यावेळी केला. मणीपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. त्यामुळे यावेळी पाच जागा राष्ट्रवादी लढणार आहे. गोव्यामध्ये कॉंग्रेस,तृणमूल आणि इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. तर पुढच्या आठवड्यात आपण स्वतः उत्तरप्रदेशात जाणार असून तेथे समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या – मोठ्या पक्षांशी आघाडी झाली आहे. यासंदर्भात आज, बुधवारी लखनऊमध्ये आघाडीतील पक्षांची बैठक होणार असून या बैठकीत जागा वाटपाची घोषणा करण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.


Assembly Election 2022 : राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात निवडणूक लढणार, शरद पवारांची घोषणा

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -