शेअर बाजाराच्या घसरणीला ब्रेक, बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये वाढ

share market

शेअर बाजाराच्या घसरणीला मोठा ब्रेक लागला आहे. आज देखील शेअर बाजार तेजीसह बंद झाला आहे. शेअर बाजारातील सेन्सेक्स ४२७ अंकांनी वधारला आहे. तर ५४ हजार १७८ या अंकांच्या तेजीसह बंद झाला आहे. तसेच निफ्टी १४३ अंकांच्या तेजीसह १६ हजार १३२ अंकांवर बंद झाला आहे

३९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली असून ११ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली आहे. त्यामुळे प्रामुख्याने MARUTI, HDFCLIFE, NESTLEIND, RELIANCE,CIPLA, HINDUNILVR यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

मागील काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या दरात घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे बाजारात तेजीचे प्रमाण दिसून आले आहे. सेन्सेक्स ४२५ अंकांच्या तेजीसह ५४ हजार १७५ वर सुरू झाला तर निफ्टी १३२ अंकांच्या तेजीसह १६ हजार १२० वर सुरू झाला. तसेच बँकिंग, आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

काल बुधवारी व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स ६१६.६२ अंकांच्या म्हणजेच १.१६ टक्क्यांच्या वाढीसह ५३ हजार ७५०.९७ वर बंद झाला आहे. दुसरीकडे निफ्टी १७८.९५ अंकांच्या म्हणजेच १.१३ टक्क्यांच्या वाढीसह १५ हजार ९८९ वर बंद झाला आहे.


हेही वाचा : आता ‘गद्दार’ कोण नंदिनी विचारे की, ठाण्यातील 66 माजी नगरसेवक?