घरताज्या घडामोडीValentine's Day : आधी बांबूचे फटके, मग हात पाय तोडणार, व्हॅलेंटाईन...

Valentine’s Day : आधी बांबूचे फटके, मग हात पाय तोडणार, व्हॅलेंटाईन डे विरोधात विरोधात शिवसेना आक्रमक

Subscribe

व्हॅलेंटाईन डे हा पाश्चात्य संस्कृतीतील सण आहे. तिथल्या संस्कृतीचे ते प्रतिक आहे. त्याच्याशी आपला काहीही संबंध आहे. त्यामुळे या दिवसाचा तीव्र विरोध केला जाईल.

Valentine’s Day : मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी तयार असलेल्या प्रेमी युगुलांवर शिवसेना समर्थकांना लक्ष असणार आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी शिवसेना समर्थकांकडून इशारा देण्यात आला आहे. प्रेमी युगुल व्हॅलेंटाईन डे साजरा करताना आढळले तर त्यांनी आधी बांबूचे फटके देण्यात येतील आणि त्यानंतर त्यांचे हात पाय तोडण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली आहे.भोपाळच्या कालिका शक्तीपीठ मंदिरात रविवारी शिवसैनिकांनी बांबूंची पूजा केली. कोणीही आज व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दिसला तर त्यांचे हात पाय तोडण्याची घोषणा केली आहे.

शिवसेनेच्या समर्थकांनी व्हॅलेंटाईन डेला विरोध करण्यासाठी विशेष तयारी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, व्हॅलेंटाईन डेला एकत्र येऊन कोणीही सेलिब्रेशन करताना दिसले तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. व्हॅलेंटाईन डे हा पाश्चात्य संस्कृतीतील सण आहे. तिथल्या संस्कृतीचे ते प्रतिक आहे. त्याच्याशी आपला काहीही संबंध आहे. त्यामुळे या दिवसाचा तीव्र विरोध केला जाईल.

- Advertisement -

या कार्यकर्त्यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या प्रेमी युगुलांना शोधण्यासाठी शहरातील नाक्या नाक्यावर चांगलाच बंदोबस्त केला आहे. त्याचप्रमाणे रेस्टॉरंट आणि हॉटेल मालकांना आज कोणत्याही स्पेशल ऑफर्स, डिस्काऊंट देऊन प्रेमी युगुलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न न करण्याचा इशारा देखील दिला आहे. शिवसेना आणि हिंदुत्वादी संघटनेच्या इशाऱ्यानंतर शहरातील पोलिसांकडून त्यांनी सुरक्षेची मागणी केली आहे.

भोपाळमधील एडिशनल डीसीपी राजेश भदौरिया यांनी म्हटले आहे की, व्हॅलेंटाईन डे दिवशी लोकांना त्रास देणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल.त्याचप्रमाणे सिव्हिल ड्रेस कोटमध्ये पोलीस पार्क, मॉल्स सारख्या ठिकाणी तैनात असतील. कोणतेही कार्यकर्ते कायदा आपल्या हातात घेऊ शकत नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Kiss Day च्या निमित्ताने आपल्या पार्टनरला द्या खास सरप्राईज अन् करा इम्प्रेस

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -