Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ Karnataka मुख्यमंत्री पदावरील तिढ्या दरम्यान डी.के. शिवकमार म्हणाले; 'मी पक्षाला ब्लॅकमेल किंवा...

Karnataka मुख्यमंत्री पदावरील तिढ्या दरम्यान डी.के. शिवकमार म्हणाले; ‘मी पक्षाला ब्लॅकमेल किंवा बंडखोरी करणार नाही, पण…’

Subscribe

कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा तिढा आता दिल्लीत गेला आहे. दरम्यान दिल्लीला निघालेले शिवकुमार यांनी सूचक वक्तव्य केल. पक्षाला विधानसभेत एवढे यश कोणामुळे मिळाले हेही पक्ष श्रेष्ठींनी लक्षात ठेवावे, असे ते म्हणाले.

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभेतील दणदणती विजयाला दोन दिवस झाले आहेत. या दोन दिवसात काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडू शकलेली नाही. पक्षात दोन महत्त्वाचे नेते आहेत जे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्यात एक माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या आणि दुसरे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार (DK Shivakumar).

शिवकुमार मंगळावारी त्यांची बाजू हायकमांडसमोर ठेवण्यासाठी दिल्लीला येत आहेत. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी डी.के. शिवकुमार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मी कोणत्याही पदासाठी पक्षाला धोका देणार नाही, ना पक्षाला ब्लॅकमेल करणार.’

- Advertisement -

शिवकुमार यांच्या नेतृत्वात कर्नाटमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्रीपद कोणाला मिळते, याची उत्सूकता सर्वांनाच आहे. तर शिवकुमार हे लोकसभेच्या तयारीला लागले असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. ते म्हणाले, आता लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधून २० जागा जिंकण्याचे आमच्यासमोर आव्हान आहे. आमचा पक्ष एकजूट आहे, आणि मी कोणालाही दूर करु इच्छित नाही. मी एक जबाबदार पदाधिकारी आहे. मी ना पक्षाला धोका देणार, ना पक्षाला ब्लॅकमेल करणार..’

- Advertisement -

आज मी जो काही आहे, तो काँग्रेसमुळे आहे, असे सांगत शिवकुमार सुचकपणे म्हणाले, “आम्ही हा पक्ष (काँग्रेस) तयार केला आहे. आमचं घर निर्माण केलं आहे. मी त्याचा एक भाग आहे.. एक आई आपल्या मुलाला सर्वकाही देणार..”
एनडीटीव्हीसोबत बोलताना शिवकुमार म्हणाले, मी पक्षाला ब्लॅकमेल करणार नाही की बंडखोरी देखील करणार नाही. मात्र पक्षानेही लक्षात घेतले पाहिजे की एवढ्या मोठ्या यशामागे कोण आहे. या सूचक वक्तव्यातून शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपली दावेदारी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी यांना सोमवारी पक्ष निरीक्षकांच्या टीमने नवनिर्वाचित आमदारांचे काय म्हणणे आहे ते कळवले आहे. पक्ष निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, भंवर जितेंद्र सिंह आणि दीपक बावरिया यांनी रविवारी झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत गुप्त मतदान देखील घेतले. सूत्रांची माहिती आहे की त्याचा निकाल हा पक्षाध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. खर्गे यांना मुख्यमंत्री निवडीचे सर्वाधिकार आमदारांनी एकमताने दिले आहेत.

पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार येत्या २४ तासांत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

- Advertisment -