घरताज्या घडामोडीगरीब देशांमध्ये लशींचा तुटवडा आणि श्रीमंत देशात लशींची उपलब्धता

गरीब देशांमध्ये लशींचा तुटवडा आणि श्रीमंत देशात लशींची उपलब्धता

Subscribe

कोरोना लसींचे जागतिक वितरण आद्याप असमान

जगभरातील सर्वच देशांना कोविड-१९चा फटका बसला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव जगातील सर्व देशात पसरला आहे. जगभरात बहुप्रतिक्षित असलेली कोरोना लस बाजारात आली असून देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या कोरोना लसींची विक्री जागतिक बाजारपेठेत करत आहेत. यामुळे सर्व देशांना लसीं विकत घेणे शक्य झाले आहे. लस खरेदीमध्ये श्रीमंत देशांनी मात्र बाजी मारली आहे तर गरबी देशांना याचा फटका बसत आहेत. कोरोनामुक्तीसाठी श्रीमंत देशांनी मोठ्या प्रमाणात लसीचे डोस खरेदी केले आहेत.

जगभरातील कोरोना लसींच्या डोस खरेदीपैकी एकुण ०.०३ टक्के डोस जगातील २९ गरीब देशांमध्ये देण्यात आले आहेत. तर जगात आतापर्यंत एकुण ९ टक्के लोकांचे लसीकरण पुर्ण झाले आहे. जगात लसींच्या डोसची मागणी वाढली असल्यामुळे लस उत्पदन करणाऱ्या कंपन्यांनी लसीच्या डोसचे उत्पादन वाढवले आहे. जगभरातील देशांनी कोट्यावधींचा करार कंपन्यांशी केला आहे. प्रत्येक महिन्यात मॉडर्नना, फायझर आणि जॉनसन आणि जॉनसन्समध्ये ४०० दशलक्ष ते ५०० दशलक्ष लसींच्या डोस तयार करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

- Advertisement -

जगातील ७० टक्के लोकांचे लसीकरण करण्यासाठी कमीत कमी ११ अब्ज लसींच्या डोसची गरज आहे. बऱ्याच कंपन्यांना लसींचे डोस पुरवण्यासाठी त्याचे उत्पादन घेण्यास कच्चा माल आणि मुख्य उपकरणे कमी प्रमाणात आहेत. कच्चा मालाची मागणी वाढली आहे. अनेक देशांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व्यापर बंद ठेवला आहे. याचा फटका देखील लस उत्पादन करणारऱ्या कंपन्यांना बसत आहे.

जगभरातील पाश्चिमात्य देशांनी कोरोना लसींच्या खरेदीसाठी मोठी रक्कम आणि कंत्राट केले आहे. फायझर आणि मॉडर्ना अब्जावधी लसींच्या डोसचे उत्पादन केले आहे. जगातील आघाडीच्या लस उत्पादित कंपन्यांनी गरीब देशांना माफक दरात लसींची विक्री केली पाहिजे. श्रीमंत देश मोठ्या प्रमाणात लसींची खरेदी करत आहेत. यामुळे गरीब देशांना कोरोना लसींचे कमी डोस मिळत आहेत. गरीब देशांना लसींचे डोस मिळण्यासाठी श्रींमंत देशांनी कमी लसींचे डोस खरेदी करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला होता.

- Advertisement -

कोरोना लसींचे जागतिक वितरण आद्याप असमान आहे. श्रीमंत देशांनी मोठ्या प्रमाणात कोरोना लसींचे डोस खरेदी करुन ठेवले आहेत. लसींच्या डोसचा साठा केला आहे. श्रीमंत देशांनी लहान मुलांच्या लसीकरणासाठी लसींचा साठा केला आहे. तर अद्याप गरीब देशांमध्ये मोठ्यांचे लसीकरण पुर्ण झाले नाही. यामुळे गरीब देशांना लसी खरेदी करण्याची संधी द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. अमेरिका, स्वित्झर्लंड, कॅनडा सरकारने कोरोना लसींच्या डोसचा साठा केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -